Various awards announced on the occasion of the anniversary of the university
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक व निर्माता मकरंद माने यांना युवा गौरव पुरस्कार
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी श्री. अभिमन्यू समीर पुराणिक यांना पुरस्कार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १० फ्रेबुवारीला ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
विद्यापीठाचे हे अमृत महोत्सव वर्ष असून यानिमित्त ४ लोकांना २०२३ – २४ या सालचा ‘युवा गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कला विभागातील हा पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक व निर्माता श्री. मकरंद मधुकर माने यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे श्री. अभिमन्यू समीर पुराणिक (बुध्दिबळ) आणि श्रीमती. प्रणिता प्रफुल्ल सोमण(रोड सायकलिंग) यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या श्री. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांना त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यासह विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षीचा गुणवंत शिक्षकेतर सेवा पुरस्कार प्रशासन शिक्षकेतर कक्षातील शिपाई श्री. दत्तारम दगडु जाधव यांनी जाहीर झाला आहे. तर ‘दिवंगत सुरेश भिकाजी वाघमारे गुणवंत कर्मचारी पुरस्कार’ हा प्रशासन शिक्षकेतर कक्षातील सहायक कक्षाधिकारी श्रीमती. वर्षा सुरेश मुंढे, श्री. सतिश सर्जेराव आंधळे यांना देण्यात येणार आहे. तसेच ‘कै. व. ह. गोळे पुरस्कार’ जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रातील हमाल श्री. विलास भिकू मल्हारी यांना जाहीर झाला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर”