आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा

Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Union Home Minister Amit Shah’s announcement to implement the CCA( Citizenship Amendment Act ) before the upcoming Lok Sabha elections

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा

  • नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही
  • CAA बद्दल लोकांना भडकवलं जातंय 
  • गैर-मुस्लिम स्थलांतरितांना देणार नागरिकत्व

    Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
    File Photo

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी CAA (Citizenship Amendment Act) अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. नवी दिल्लीत एका खासगी वृत्त वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संसदेनं डिसेंबर २०१९ मध्ये या कायद्याला मंजुरी दिली आहे. लोकांना नागरिकत्व देणारा हा कायदा असून नागरिकत्व काढून घेणारा नसल्याचं ते म्हणाले.

“नागरिकत्व सुधारणा कायदा हे काँग्रेसचे वचन होते. देशाची फाळणी झाली तेव्हा देशातील अल्पसंख्याकावर अत्याचार झाले. तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत केले आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आता मागे हटत आहेत”, अशीही टीका अमित शाहांनी यावेळी केली. तसंच, “हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

“आपल्या देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषतः मुस्लिम समुदायातील लोकांना त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल, असं भडकवलं जात आहे. परंतु, सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व हिसकावून घेतलं जाणार नाही. कारण त्याबाबत तशी तरतूदच करण्यात आलेली नाही. सीएए हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे”, असं शाह म्हणाले.

“३१ डिसेंबर २०१४ च्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे या कायद्याचे उद्दीष्ट आहे”, असंही शाह म्हणाले. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने सीएए कायदा मंजूर केला. त्यानंतर देशभरात या कायद्याविरोधात निषेध नोंदवला गेला. हा कायदा रद्द व्हावा याकरता निदर्शने करण्यात आली.

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्देशानं पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका लढल्या जातील आणि यापैकी बहुतेक काम नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात सुरू होईल, असंही ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
बनावट जीएसटी पावत्या जारी करून 11.61 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक
Spread the love

One Comment on “आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *