Appeal to apply to the Caste Certificate Verification Committee.
Online application for State Common Entrance Examination for Vocational Courses is likely to be accepted in the academic year 2021-22. Backward class students seeking admission in reserved seats are required to submit Caste Validity Certificate. As per Caste Validity Certificate Verification Rules, a validity certificate is usually issued within 3 months. The committee decides. Therefore, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) has appealed to the backward class students to apply for the validity certificate in the prescribed time to the Caste Certificate Verification Committee.
Therefore, the committee should have sufficient time to issue the validity certificate, and also the backward class students should not be deprived of admission in vocational courses due to lack of caste validity certificate. To apply, students should apply within the prescribed time, appealed Shri. Dhammajyoti Gajbhiye, Director General, Barti and Chief Coordinator, District Caste Certificate Verification Committee.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
त्यामुळे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करावा, त्यामुळे विहित वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.