Appointment of Professor Santishri Pandit of Pune University as Vice-Chancellor of JNU.
पुणे विद्यापीठातल्या प्राध्यापिका संतिश्री पंडित यांची जेएनयुच्या कुलगुरुपदी नियुक्ती.
पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागातल्या प्राध्यापिका संतिश्री धुलीपुडी पंडीत यांची दिल्लीतल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. पूर्व कुलगुरु जगदीश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं या पदी पंडीत यांची नियुक्ती झाली आहे.
चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा. पंडीत यांनी ‘नेहरुंच्या काळातील संसद आणि परराष्ट्र धोरण’ या विषयावर पीएच.डी पूर्ण केली. १९८८ ते १९९२ या कालावधीत त्या गोवा विद्यापीठात आणि त्यानंतर पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत.
देशविदेशातल्या अनेक महत्त्वांच्या समित्या आणि परिषदांमध्ये त्यांनी संशोधन अहवाल सादर केले आहेत. एम. फिल आणि पीएच. डीच्या अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.