Arms and curfew orders were issued in the Satara district from midnight today.
सातारा जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी.
सातारा : संपूर्ण सातारा जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून ४ मार्च २०२२ पर्यंतच्या रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे.
उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. तसंच या काळात सज्जनगड इथं रामदास नवमी, महाशिवरात्री इत्यादी उत्सव साजरे होणार आहेत.
कोविड विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विविध सण, उत्सव, समारंभासाठी, जनसमुदाय एकत्र येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदी आदेश दिले आहेत.