Artificial Intelligence will be the basis for future research says Prof. Dr. Neeraj Saxena
Research is a continuous process. Advanced technology will make future research entirely focused on artificial intelligence. It will be the basis for future research. Students should acquire up-to-date technology. Examination system is killing the creativity inside students. We need to stop this examination system and have to do evaluation of students from different aspects, says Prof. Dr. Neeraj Saxena, Advisor of Institutional Research, AICTE, New Delhi.
Prof. Dr. Saxena was speaking at the webinar jointly organized by Suryadatta Group of Institutes, Pune & Centre for Education Growth and Research (CEGR) , New Delhi. A webinar was on Significance of Effective Research for Accreditation & Quality Enhancement. Prof. Dr. Supriya Patil, Director Internal Quality Assurance Cell, SPPU, Prof. Dr. Tankeshwar Kumar, Vice Chancellor, Guru Jambheshwar University of Science & Technology, Prof. Dr. Rakesh Ranjan, Vice Chancellor, Himgiri Zee University, Sundar Radhakrishnan – Managing Director, Emerald Publishing India, Ravish Roshan, Director CEGR, Prof. Dr. Sanjay Chordiya, Vice President CEGR and Founder President & Chairman – Suryadatta Education Foundation and Prof. Dr. Shailesh Kasande, CEO & Group Director, Suryadatta Group of Institutes were participated in this webinar.
Prof. Dr. Neeraj Saxena said, ‘Often research seems to be limited to research papers and patents’. It should go beyond that and focus on invention and production. Industry-Academia collaboration have to become powerful. It will helps to qualitative research. Every research should convert into the production and it should be industry upgradable. Applied, community oriented research, innovation, incubation, invention and production makes you accreditable and quality improver. We are going to implement IDEA Lab concept in every college and institute. It will helps students to improve their research skills. Prof. Dr. Supriya Patil mentioned that, Savitribai Phule Pune university known as Oxford of East and SPPU has always given priority to research and quality education. Though various colleges affiliated to SPPU from rural and semi rural area, we have launched ‘Avishkar’ competition to explore students ideas. Avishkar become a platform to discover research and innovative skills inside the student. With the Avishkar, Aspire, Research Park, Incubation Center and expertise from the SPPU helping students to do qualitative research.
Value-based and holistic, comprehensive education should included in the curriculum. To develop research capacity in students research at school and college level should be encouraged. We should focus on community-oriented, applied research from school level. It will help to improve the quality of education also. Practical based and research oriented education is the symbol of institute. With this, Social awareness and patriotism should be
inculcated in the students. Industry and academia should come together and think on the joint research projects. That will be helpful to both industry and academia, said Prof. Dr. Sanjay Chordiya. This webinar will prove to be very useful for Research scholars across the country and globe. It was telecasted live on Social media. Those who want to revisit this webinar can visit https://www.facebook.com/SuryadattaGroupofInstitutes/ said Dr. Sanjay B. Chordiya.
Prof. Dr. Sanjay Chordiya moderated the webinar. Prof. Dr. Tankeshwar Kumar, Prof. Dr. Rakesh
Ranjan & Sundar Radhakrishnan also expressed their views. Shri Ravish Roshan, Director CEGR
gave the opening remarks.
भविष्यात, संशोधनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार प्रा. डॉ. नीरज सक्सेना यांचे प्रतिपादन.
संशोधन ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भविष्यातील संशोधन हे पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) केंद्रित असणार आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्जनशीलतेला मारक असलेली परीक्षा पद्धती रद्द करून विद्यार्थ्यांचे विविधांगी मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यातून संशोधन, इनोव्हेशन, इनव्हेन्शन आणि प्रॉडक्शन या गोष्टीना
उभारी मिळेल, असे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) इन्स्टिट्यूशनल रिसर्चचे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना यांनी व्यक्त केले.
पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (सीईजीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यता आणि गुणवत्ता वर्धनात प्रभावी संशोधनाचे महत्त्व या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये डॉ. नीरज सक्सेना बोलत होते.
इंडस्ट्री-अकॅडमी समन्वय, युवा वर्गाला संशोधनासाठी प्रोत्साहन आणि नवकल्पनांतून निर्मिती यासाठी आयडिया लॅब राबविण्यात
येत असल्याचेही डॉ. सक्सेना यांनी नमुद केले. प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटर्नल क्वालिटी ऍश्युरन्स सेलच्या संचालिका प्रा. डॉ.सुप्रिया पाटील, गुरु जांभेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. डॉ.तानकेश्वर कुमार, हिमगिरी झी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. राकेश रंजन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व सीईजीआर चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सीईजीआरचे संचालक रविश रोशन, एमरल्ड पब्लिशिंग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर राधाकृष्णन, सूर्यदत्ताचे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी संचालक प्रा.सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. नीरज सक्सेना म्हणाले, बऱ्याचदा संशोधन हे रिसर्च पेपर आणि पेटंट यापुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसते. औद्योगिक आणि शिक्षणसंस्था यांच्यातील समन्वय वाढवायला हवा. त्यातून गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना मिळेल. संशोधन चांगले होऊन त्यातून उत्पादननिर्मिती झाली तर त्याची उपयुक्तता अधिक आहे. उपयोजित, समाजाभिमुख संशोधन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन, इन्व्हेन्शन
आणि उत्पादन याच गोष्टी शिक्षण संस्थेची गुणवत्ता व मान्यता वाढवण्यात महत्वाचे ठरते.
प्रा. डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या,ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कायमच संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना संशोधनाला चालना मिळावी, यासाठी अविष्कार सारख्या स्पर्धा घेतल्या जातात. निमशहरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतील कौशल्य, नवकल्पना त्यातून समोर येतात. अविष्कार ही केवळ एक स्पर्धा नाही, तर इनोव्हेशन, संशोधन दाखविण्याचे व्यासपीठ आहे. अविष्कारसह अस्पायर,रिसर्च पार्क, इन्क्युबेशन सेंटर, सायन्स पार्क आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांना संशोधन व इनोव्हेशनसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, सर्वांगीण व मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात व्हायला हवा. संशोधन ही सर्वकाळ चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांतील संशोधन क्षमता विकसित करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजाभिमुख संशोधनाची गोडी विद्यार्थीदशेतच लागली, तर शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. अनुभवाधारित शिक्षण आणि संशोधन हेच गुणवत्ता वाढीचे पैलू आहेत. सामाजिक जाण आणि राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. उपयोजित संशोधनासाठी संयुक्त संशोधन प्रकल्प करण्यावर भर हवा.
प्रा. डॉ. तानकेश्वर कुमार, प्रा. डॉ. राकेश रंजन, सुंदर राधाकृष्णन यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
रवीश रोशन यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी स्वागत-प्रास्ताविक, तसेच वेबिनारचे संचालन केले. संशोधन करणाऱ्या प्रत्येकासाठी हा वेबिनार अतिशय उपयुक्त होता.
ज्यांना हा वेबिनार पुन्हा पाहायचा असेल, त्यांनी https://www.facebook.com/SuryadattaGroupofInstitutes/ या संकेतस्थळावर जाऊन पाहावा, असे आवाहन डॉ. चोरडिया यांनी केले.