व्ही.पी.बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं निधन

Atul Bedekar, director of VP Bedekar & Sons, passed away व्ही.पी.बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Atul Bedekar, director of VP Bedekar & Sons, passed away

व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन, ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजलीAtul Bedekar, director of VP Bedekar & Sons, passed away व्ही.पी.बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : १९१० मध्ये विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी गिरगावात लोणची-मसाल्यांचं दुकान सुरु केलं होतं. खप वाढल्यानंतर दुकानाच्या शाखांचा विस्तार झाला. दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकानं झाली. १९४३ मध्ये ‘व्ही. पी. बेडेकर अँड सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आलं.

त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व अतुल बेडेकर करत होते. मागच्या महिनाभरापासून ते आजारी होते. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील बेडेकर सदन या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली

मराठी उद्योग समूहाचा धडाडीचा वारसदार

घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती. बेडेकर ब्रँड उभा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांसोबतच सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये बेडेकर नाव पोहोचले आहे. त्याचे श्रेय अतुलजींना जाते. त्यांच्या निधनाने एक ध्येयनिष्ठ उद्योजक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

अतुल बेडेकर यांच्या निधनाने प्रयोगशील उद्योजक हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“व्ही.पी. बेडेकर आणि सन्स उद्योग समूहाचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणारे प्रयोगशील उद्योजक आपण गमावले आहेत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, “लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच त्यात काळानुरुप बदल करून अतुल बेडेकर यांनी बेडेकर ब्रँडला वेगळे स्थान निर्माण करून दिले. शंभर वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या व्यवसायास आपल्या प्रयोगशीलतेने जागतिक ओळख निर्माण करून दिली.

आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणाऱ्या उद्योग समूहांपैकी असणाऱ्या बेडेकर उद्योग समूहाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांच्या निधनानं मराठी उद्योगजगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बेडेकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण मागे

Spread the love

One Comment on “व्ही.पी.बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *