Awareness of the Govt’s public welfare schemes through folk art teams
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकांद्वारे गावोगावी जागर
पुणे : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे.
लोकांसाठीच्या योजना सोप्या, सहज आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यत लवकर पोहोचतात. म्हणूनच या पारंपरिक माध्यमाचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी केला जात आहे.
कलाछंद कलापथकाच्यावतीने लोणावळा, कामशेत, आळंदी, जय मल्हार कलामंच पथकाच्यावतीने डोणजे, पिंरगूट आणि प्रसन्न प्रॉडक्शन्सच्यावतीने दौंड, सुपे, वरंवड, यवत, कानगाव, दौंड येथे कार्यक्रम करण्यात आले आहे.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत असा या मोहिमेचा उद्देश आहे.
कोविड काळात नागरिकांना केलेली मदत, कोविड लसीकरण अभियान, माझे गाव-कोरोना मुक्त गाव, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दिन दयाळ उपाध्याय योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना,मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती या पथकांनी दिली. कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.