किल्ले शिवनेरी, जुन्नर येथे बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वित्तीय समावेशन सुविधा अभिगम कार्यक्रमाचे आयोजन

Bank of Maharashtra Organizes Financial Inclusion Facility Access Program for Economically Weaker Sections at Fort Shivneri, Junnar

किल्ले शिवनेरी, जुन्नर येथे बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वित्तीय समावेशन सुविधा अभिगम कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने समाजातील दुर्बलBank of Maharashtra घटकांसाठी वित्तीय समावेशन व कर्ज सुविधा अभिगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित होत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे पश्चिम विभागातर्फे दिनांक १९ व २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या “ महाबँक आपल्या दारी “ कार्यक्रमाच्या अंतर्गत हाती घेतलेल्या वित्तीय समावेशन योजनेच्या अंतर्गत उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, मावळ तालुका, मुळशी तालुका, खेळ तालुका, आंबेगाव तालुका व जुन्नर तालुका व्यापित असलेलेया या विभागातील सर्व ६१ शाखांनी या कार्यक्रमात भाग घेतला .

सदर कार्यक्रमास बचत गटांचे सुमारे ३५० सभासद एकत्रित जमले होते व विविध योजनांच्या द्वारे बँकेने लाभार्थ्यांना सुमारे रु ४.०० कोटी रकमेची कर्जे मंजूर केली. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार यांनी अभियानाचे नेतृत्व केले.

समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच प्रयत्नशील असते असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या विविध स्तरातील ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा पूर्ण करतील अशा बँकेच्या अनेक योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी वित्तीय समावेशन व कर्ज अभिगम कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल श्री विजयकुमार यांनी बँकेच्या पुणे पश्चिम विभागीय कार्यालयाच्या टिमचे कौतुक व अभिनंदन केले.

वित्तीय समावेशन कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विकास, पंतप्रधान जनधन योजना पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना, स्टैंडअप इंडिया, विविध बचत गट योजना व डिजिटल प्रॉडक्टस इत्यादी शासन पुरस्कृत योजनांच्या अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांना वित्तीय सहाय्य कार्यक्रमात मंजूर करण्यात आली. पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना यांच्या अंतर्गत आतापर्यंत समाविष्ट न झालेल्या पात्र प्रौढ व्यक्तींना सहभागी करून घेण्याचे औचित्य सद्य सुरु असलेल्या जनसुरक्षा अभियानाच्या द्वारे साधण्यात आले .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *