Banks should immediately finance agriculture through one window scheme – Chief Minister Uddhav Thackeray.
State-level Bankers Committee meeting approves annual credit plan of Rs. 4 lakh 60 thousand 881 crores.
In the same way that projects under Ease of Doing Business are expedited in the industrial sector, banks should immediately approve all proposals under agriculture through a one-stop-shop scheme to enable agriculture and farmers through increased credit, Chief Minister Uddhav Thackeray said today.
He was speaking at the 151st meeting of the State Level Bankers Committee chaired by the Chief Minister here today. The meeting approved the state’s credit plan of Rs 4 lakh 60 thousand 881 crores for 2021-22. In this plan, the target for the agriculture sector is Rs. 1 lakh 18 thousand 720 crore,s and the target for crop loan is Rs. 60 thousand 860 crore. A target of Rs. 2 lakh 49 thousand 139 crores has been set in the annual credit plan of banks for small, medium, and micro-enterprises. The credit target for other priority groups is Rs. 93022 crores.
The Chief Minister further said that the overall development of the agricultural sector is being emphasized in the state under the ‘Vikel te Pickel’ campaign. It focuses on issues ranging from crop planning to market research, development of infrastructure in the agricultural sector, development of agro-processing industries, value addition of crops. Accordingly, various departments of the government and the banks should sit together and formulate a policy on how to make the farmers and the agricultural sector more capable.
Stating that the agricultural sector, which remained open during the Corona crisis, saved the state’s economy, the Chief Minister said that banks should play a role in co-operating with the creditors when it comes to village development. Banks should make pickers available to farmers on time as the rains are said to be satisfactory this year.Dr. Punjabrao Deshmukh’s interest repayment scheme, which provides loans to farmers who repay their loans at zero percent interest rate up to Rs. 1 lakh, is now being extended to Rs. 3 lakh. The Chief Minister said this time.
Picker loans should be available in time – Deputy Chief Minister Ajit Pawar.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that loans should be made available to farmers easily and on time for the Kharif season. Farmers in that district will be severely deprived of credit supply. “Banks provide easy loans to large farmers but also to small farmers. Banks should provide easy loans to commercial farmers, provide information on how many loans they have given to farmers, revise the limit imposed by NABARD and RBI on the financing of the sugar industry,” he said.
Commercial banks should increase credit supply to farmers – Agriculture Minister Dadaji Bhuse.
Farmers’ deposits are widely accepted in commercial banks, but it should not be the case that these banks are reluctant to provide loans to the same farmers, he said. Bhuse said 19 percent of crop loans have been disbursed so far this year. Of this, co-operative banks account for 33 percent and commercial banks 4 percent. Therefore, commercial banks should increase credit to farmers. He hoped that banks would link new farmers with banks for pick-up loans, increase the number of bank branches in rural areas, increase equitable credit in rural areas and also provide loans to women self-help groups.
Bank branches should be expanded in proportion to the population – Co-operation Minister Balasaheb Patil
Co-operation Minister Balasaheb Patil hoped that the branches of all the banks in the state would expand in proportion to the population. He further said that crop loans should be made available to all farmers in the state by the end of June. He also said that a separate review of commercial banks should be done to see if these banks meet their objectives.
The meeting was attended by Minister of State for Agriculture Vishwajeet Kadam, Chief Secretary Sitaram Kunte along with members of State Level Banks Committee, Union Additional Secretary Vandita Kaul, senior officials of various government departments, Reserve Bank, NABARD office bearers and other dignitaries. The doubts and difficulties faced by the banks were resolved at this time.
एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ४ लाख ६० हजार ८८१ कोटी रुपयांच्या वार्षिक पतआराखड्यास मंजुरी.
उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगाने मंजुरी दिली जाते त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीने एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची १५१ वी बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्याच्या २०२१-२२ साठीच्या ४ लाख ६० हजार ८८१ कोटी रुपयांच्या राज्याच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट १ लाख १८ हजार ७२० कोटी रुपये असून यामध्ये पिक कर्जासाठीचे उद्दिष्ट ६० हजार ८६० कोटी रुपयांचे आहे. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी बँकांच्या वार्षिक पतआराखड्यात २ लाख ४९ हजार १३९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर प्राधान्यगटातील क्षेत्रांसाठीचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट ९३०२२ कोटी रुपयांचे आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये पिक नियोजनापासून बाजारपेठ संशोधन, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, पिकांचे मूल्यवर्धन, या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शासनाचे विविध विभाग आणि बँकांनी एकत्रित बसून शेतकरी बांधवांना आणि शेतीक्षेत्राला अधिक सक्षम कसे करता येईल याचे एक धोरण निश्चित करावे.
कोरोनाच्या अडचणीच्या काळात खुल्या राहिलेल्या कृषी क्षेत्राने राज्य अर्थव्यवस्थेला तारले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गाव विकासाचा विचार करतांना पतपुरवठ्याच्या ज्या बाबी असतील त्यांना सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी घ्यावी. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याचे सांगितले जात असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबविली जाते याची मर्यादा आता ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असून बँकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे व बँकांनी या अन्नदात्याच्या पाठीशी आधारस्तंभ बनून उभे राहावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पीक कर्जाची वेळेत उपलब्धता व्हावी – उपमुख्यमंत्री अजित पवार.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभरितीने आणि वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागपूर, नंदूरबार, धुळे, नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांच्या सहकारी बँका अडचणीत आहेत त्यांना नाबार्डने पुर्न वित्तपुरवठा (रिफायनान्स) करावा कारण या बँकांना वित्तपुरवठा न झाल्यास त्या जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुरवठ्या पासून मोठ्याप्रमाणात वंचित राहतील. बँका मोठ्या शेतकऱ्यांना सहज कर्ज देतात पंरतू अल्पभूधारक शेतकऱ्यांना बॅकांनी सहजतेने कर्ज पुरवठा करावा, वाणिज्यिक बँकांनी किती शेतकऱ्यांना किती कर्ज दिले याची माहिती द्यावी, साखर उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याची नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने घातलेली मर्यादा सुधारित रित्या वाढवावी, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा – कृषीमंत्री दादाजी भुसे.
वाणिज्यिक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जातात परंतु त्याच शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करतांना मात्र या बँका हात आखडता घेतात असे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, यावर्षी आतापर्यंत १९ टक्के पिक कर्ज देण्यात आले आहे. यामध्येही सहकारी बँकांची कर्ज पुरवठ्याची टक्केवारी ३३ टक्के आहे तर वाणिज्यिक बँकांची ४ टक्के. त्यामुळे वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा वाढवावा. नवीन शेतकऱ्यांना बँकांनी पिककर्जासाठी बँकांशी जोडावे, ग्रामीण भागात बँकांच्या शाखा कमी आहेत त्या वाढवाव्यात, ग्रामीण भागात समतोल पतपुरवठा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच महिला बचतगटांना कर्ज पुरवठा करतांना, खाते उघडतांना बँका खूप त्रास देत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसंख्येच्या प्रमाणात बँक शाखांचा विस्तार व्हावा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील.
लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात सर्व बँकांच्या शाखांचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की, जून अखेरपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक कर्जाची उपलब्धता ही केलीच पाहिजे. व्यापारी बँकांचा वेगळा आढावा घेऊन या बँका उद्दिष्टपूर्ती करतात की नाही हे पाहिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
बैठकीस कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह राज्यस्तरीय बँकस समितीचे सदस्य, केंद्रीय अतिरिक्त सचिव वंदिता कौल, शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, नाबार्डचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बँकांना असलेल्या शंका आणि अडचणींचे यावेळी निराकरण करण्यात आले.