Be prepared to block a possible third wave of the corona.

Be prepared to block a possible third wave of the corona.

  Home Minister Dilip Walse Patil instructed the administration to be ready to contain the possible third wave of the corona by implementing the measures effectively. He also promised to face Corona in solidarity. He was speaking at a review meeting held at the Divisional Commissioner’s Office, Pune on the current status of coronavirus in the district, the current status of mucormycosis, measures to be taken by the administration, medical facilities for young children, and vaccination. Home Minister Walse Patil further said that there has been a huge increase in health facilities as compared to the first wave. So it definitely benefits. Guardian Minister Ajit Pawar has provided funds for the Pune district from time to time. So facilities have been created.  Mucormycosis is a new disease. The disease occurs suddenly. He was also directed to take appropriate measures as its treatment is expensive.

Instructions for appropriate measures against mucormycosis.

Pune district’s lead in vaccination is commendable.

Suggestions for Emphasis on Institutional Separation in Rural Areas.

Amphotericin B injection available soon.

-Home Minister Dilip Walse Patil.

 

 Health Minister Rajesh Tope said Pune district has taken the lead in vaccination. Corona tests need to be increased along with vaccination.  There have been complaints of overcharging from patients admitted to the hospital for corona treatment. Therefore, it should be checked daily whether the bill is levied as decided by the government. Take action against hospitals that charge extra. He directed that the hospitals which have high complaints of over-billing should check every bill.  Instructing to focus on institutional segregation in rural areas, Health Minister Shri. Tope said the health department should focus on institutional segregation of citizens in rural areas instead of home segregation. Institutional segregation will definitely increase the patient’s recovery rate through daily examination of the patient. Also, the number of patients with mucormycosis is increasing and amphotericin B injections required for the treatment of this disease will be available soon. MP Girish Bapat, MP Shrirang Barne, MP Vandana Chavan, and others were present on the occasion. Sir, you raised important issues.

  Collector Dr. Rajesh Deshmukh said the coronary heart rate in the district has been declining this week as compared to last week. Measures being taken by the administration in Pune district to reduce the patient mortality and mortality rate by providing information about the medical services being provided by the administration for children, sample testing of citizens, affected patients, hospital management, availability of ambulances and hearses, jumbo covid hospital management, vaccination status, oxygen He also gave information about the demand for remedicavir, supply covid-19 and the incidence of mucormycosis and mortality. Also, District Collector Dr. Deshmukh informed about the measures being taken to improve the supply of oxygen and remediation. Strict action was taken against the citizens who did not comply with the restrictions.

 The meeting was attended by the chief officers of various agencies.

Rajesh Tope & Dilip Walse Patil
Home Minister Walse Patil & Health Minister Rajesh Tope at Corona review meeting in Pune

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा. 

   कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवली. संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे,

  गृहमंत्री वळसे पाटील पुढे म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होतो आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सुविधा निर्माण झाल्या आहेत. म्युकरमायकोसीस या नवीन आजाराची भर पडली आहे. हा आजार अचानक उद्भवतो. त्याचे उपचार महागडे आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

म्युकरमायकोसीस आजाराबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश.

पुणे जिल्ह्याने लसीकरणा मध्ये आघाडी ही कौतुकास्पद बाब ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण यावर भर देण्याच्या सूचना.

जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा.

ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन लवकरच उपलब्ध.

-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

 

  आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, पुणे जिल्ह्याने लसीकरणा मध्ये आघाडी घेतली आहे. लसीकरणा सोबत कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज आहे.   कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी. असे निर्देश त्यांनी दिले.   ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा,  संस्थात्मक विलगीकरणामुळे रुग्णाची दैनंदिन तपासणी होवून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितपणे वाढेल. तसेच म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारांसाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन लवकरच उपलब्ध होईल. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, यांच्यासह उपस्थित आ. महोदयांनी महत्त्वाचे विषय मांडले.

   जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती देवून  पुणे जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी, पुरवठा कोविड-19 व म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी माहिती दिली. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. 

 बैठकीत विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *