Best performance of Pune district in my Vasundhara Abhiyan.

Best performance of Pune district in my Vasundhara Abhiyan.

Pune will be honoured for the best performance of the Pune district The program will be held in the presence of Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar

 Pune district has made a name for itself in the country with its spectacular achievements in agriculture, industry, information technology and various other fields. Pune district has been honoured at the national level for its exemplary implementation of many schemes of the Central and State Governments. The ‘Majhi Vasundhara Abhiyan’ has been implemented in the Municipal Council area from 2nd October 2020 to 31st March 2021 by the Environment and Climate Change Department of the State Government. Pune district will be honoured on June 5, 2021, under the chairmanship of Chief Minister Uddhav Thackeray and in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. The ‘My Vasundhara Abhiyan’ has been implemented by the Department of Environment and Climate Change in the Municipal Council area from 2nd October 2020 to 31st March 2021 and the award for the best performance in this campaign has been announced to the Pune district.

 ‘My Earth’ campaign to adopt a sustainable nature-friendly lifestyle

As per the decision of the state government dated 14th October 2020, it was decided to implement the campaign ‘Majhi Vasundhara’ with the help of local self-governing bodies to adopt a sustainable natural lifestyle by taking measures based on the five principles. To work on issues related to earth principles such as afforestation, forestry, solid waste management, wastewater management and land degradation. Improving air quality by reducing air pollution for air quality so that air principles can be protected. Promoting water conservation-related rivers, conservation and protection of water resources as well as efficient use of energy-related to fire principles, energy-saving as well as energy wastage prevention, innovative initiatives for non-conventional energy generation, lands on both sides of highways, wastelands, agricultural dams. The key issues are to inculcate in the masses through awareness programs and educational programs for changes in human nature by fixing the principles in the form of place and light. Under this campaign, marks have been given to evaluate the work done by the local self-governing bodies on the five principles related to nature – earth, air, water, fire and sky.

 Score by the division under Panchatattva.

Air quality testing by experimental schools approved by the Ministry of Earth, Green Cover and Biodiversity, Solid Waste Management, Gas, Environment, Forests and Climate Change, Water Conservation, Rainwater Harvesting and Percolation, Sanitation of rivers, ponds and streams, Sewage, Sewage management and treatment, Fire, promotion of renewable energy sources, totally solar-powered / LED lights, number of green buildings, promotion of electric vehicles – charging points available.m Aakash, public awareness for environmental improvement and protection, oaths were taken by citizens for nature conservation, Aakash is graded. There is a method of giving marks out of 1500 marks. 

Accelerated the campaign through the initiative of District Collector Dr Rajesh Deshmukh.

The district administration has given impetus to this campaign through the initiative of District Collector Dr Rajesh Deshmukh to implement my Vasundhara Abhiyan Yojana effectively in the municipal area. A live and online review meeting of all the Chief Officers, Municipal Councils and Nagar Panchayats in the district was held from time to time. All the Chief Officers, Municipal Councils and Nagar Panchayats on Tuesdays and Fridays two days a week from 6 to 8 in the morning in the Municipal Council area to implement the campaign and instructed to upload photos. Guided from time to time by inspecting accordingly. Corona conducted periodic inspections on how the scheme is being implemented in the municipal area during periodic taluka level inspection visits for effective implementation of the contagion measures. Tree planting campaign at Shirur and Indapur and Indrayani river cleaning at Alandi. My Vasundhara Yojana was reviewed at the meeting of the Branch Officers held every Monday at the Collectorate. All the department heads were sworn in to implement the scheme and abide by the green law. Care was taken to ensure that monthly reports and photographs of the action taken by all the Municipalities would be submitted to the Government within the stipulated time every month. Funds were made available for the proposal submitted by the Municipal Council for solid waste management, electric lights, green belt and other necessary works.

 40,000 trees planted at Municipal Council level, 22 green belts developed

In Pune district, Baramati, Lonavla, Talegaon Dabhade, Daund, Chakan, Junnar, Alandi, Shirur, Saswad, Jejuri, Bhor, Indapur, Rajgurunagar, 13 Municipal Councils and Wadgaon Maval Nagar Panchayat, a total of 14 civic local bodies had participated in my Vasundhara Abhiyan. A total of 40,000 trees were planted during the campaign period out of which 80 per cent were native species. A total of 22 green belts were developed. Charging points have been provided at 11 places to promote electric vehicles. Cycle days have been fixed in each municipality. On this day, preference was given to cycling and walking without using polluting vehicles. More than 50 bicycle campaigns were launched in the city. In Lonavla, actor Sunil Shetty and actress Ayesha Jhulka and in Wadgaon, actress Sayali Sanjeev were present and gave messages for environmental awareness. Rangoli competitions, terrace garden competitions, essay writing competitions, oratory competitions, painting competitions were organized in the municipal area and the campaign was widely publicized through street plays, jingles on bell carts, social media hoardings, murals. Large scale tree planting and cleaning campaign were carried out with the participation of citizens. Rivers, lakes, ponds and nallas were cleaned in the municipal area. In the municipal area, a total of 60,000 citizens were sworn in individually and 22,000 collectively to abide by the green law. Unconventional energy projects and solar LED lights were installed in the city. The city’s pollution levels were checked every month.

Baramati, Lonavala, Saswad and Wadgaon Maval Municipal Councils have been declared eligible in the final round.

In my Vasundhara Abhiyan, Lonavla Municipal Council has implemented innovative initiatives such as Oxygen Junction, Waste Sorting, Air Pollution Inspection, Lake Conservation, Solar Power Generation, Electrical Charging Point and Tree Care Dindi. This initiative has shown good results.

– Shri Somnath Jadhav, Chief Officer, Lonavla Municipal Council

In my Vasundhara Abhiyan, Saswad Municipal Council has planted native species of trees. In Saswad city, 10,000 citizens have been sworn in for environmental conservation for rainwater harvesting, air quality inspection, use of solar energy for water supply and public awareness.

Mr Vinod Jhalak, Chief Officer Saswad

Under the Jejuri Municipal Council, in my Vasundhara Abhiyan, water has been recharged to keep the natural sources of the water alive. The message of environmental conservation was conveyed through the organization of tree planting as well as cycle tours.

Mrs Poonam Kadam, Chief Officer, Jejuri

12,300 trees were planted through Baramati Municipal Council. A total of nine air samples were tested between January and March under the gaseous principle. Various roads in the cities have been greened on both sides. Under the water element, two storage ponds of 355 million litres and 128 million litres are in operation and work on the third storage pond with a capacity of 165 million litres is in progress. In addition, an 11.5 million litres per day capacity wastewater treatment plant is currently operational in the city and 3 wastewater treatment plants with a combined capacity of 11 million litres per day are proposed.

Under the principle of fire, solar panels with a capacity of 60 kW have been installed at the municipal office.

Shri Kiranraj Yadav, Chief Officer, Baramati 

माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी 

-पुणे जिल्ह्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा होणार गौरव -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

 शेती, उद्योग, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रातील नेत्रदिपक कामगिरीने पुणे जिल्ह्याने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनेक योजनांची आदर्श अंमलबजावणी केल्यामुळे पुणे जिल्ह्याचा देशपातळीवरही गौरव करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात आले असून या अभियानातही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे.  ५ जून २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणा-या ऑनलाईन सन्मान सोहळयात पुणे जिल्हयाचा गौरव करण्यात येणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले असून सदर अभियानात सर्वोत्तम कामगिरी साठी पुरस्कार पुणे जिल्ह्याला जाहीर करण्यात आला आहे.  

 शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

राज्य शासनाच्या 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून  शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्त्वांचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. जल तत्त्वांशी संबंधित नदी संवर्धन,  जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच अग्नी तत्त्वांशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, उर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन , अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीचे बांध यासारख्या जागांवर राबविणे आणि आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमाणसांत बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी गुण ठेवण्यात आले आहेत.

 पंचतत्त्व अंतर्गत विभागणीने गुणांकन

पृथ्वी,हरित आच्छादन आणि जैवविविधता,घनकचरा व्यवस्थापन,वायू, पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने मान्यता दिलेल्या प्रयोग शाळांमार्फत परीक्षण करण्यात आलेली वायू गुणवत्ता,धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जागेचे हरितीकरण,नागरी भागात नॉन मोटराइड वाहतुकीस प्रोत्साहन (नागरी),वायू,जल, जलसंवर्धन,रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता,सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया,

अग्नी,नूतनीकरणयोग्य स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन,एकूण सौरऊर्जेवर चालणारे/ एलईडी चालणारे दिवे, हरित इमारतींची संख्या,विद्युत वाहनांना प्रोत्साहन – चार्जिंग पॉईंट उपलब्ध 

आकाश,पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती, निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ,आकाश अशी विभागणी करून गुणांकन करण्यात येते. 1500 गुणांपैकी गुण देण्याची पद्धत आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारातून अभियाला गती

‘माझी वसुंधरा अभियान योजना नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनाने या अभियानाला गती दिली. जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांची प्रत्यक्ष व ऑनलाईन आढावा बैठक वेळोवेळी घेण्यात आली. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांनी आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व शुक्रवारी या दिवशी सकाळी ६ ते ८ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रात सदर अभियान राबविण्याबाबत प्रत्यक्ष भेटी देत व त्याचे फोटो अपलोड करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाहणी करून वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोरोना संसर्ग उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी तालुकास्तरीय पाहणीदौरा करतेवेळी नगरपालिका क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याबाबत प्रत्यक्ष आढावा घेतला. शिरूर व इंदापूर येथे वृक्ष लागवड मोहीम व आळंदी येथे  इंद्रायणी नदी सफाई या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर सोमवारी आयोजित शाखाधिकारी यांचे बैठकीत माझी वसुंधरा योजनेचे सादरीकरणातून आढावा घेण्यात आला. सर्व विभाग प्रमुखांना सदर योजनेची अंमलबजावणी करणेबाबत व हरित कायद्याचे पालन करण्याची शपथ देण्यात आली . सर्व नगरपालिकांनी केलेल्या कारवाईचे मासिक अहवाल व छायाचित्रे दरमहा विहित मुदतीत शासनास सादर केले जातील याची दक्षता घेतली. घनकचरा व्यवस्थापन, विद्युत दिवे, हरित पट्टा व इतर आवश्यक कामांसाठी नगरपरिषदेणे सादर केलेल्या प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्यात आला.   

नगरपरिषद स्तरावर ४० हजार वृक्ष लागवड, २२ हरित पट्टे विकसित

पुणे जिल्ह्यात बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, दौंड, चाकण, जुन्नर, आळंदी, शिरूर, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, राजगुरुनगर या १३ नगरपरिषदा व वडगाव मावळ नगरपंचायत अशा एकूण १४ नागरी स्थानिक संस्थांनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला होता. अभियान कालावधीत एकूण ४० हजार वृक्ष लागवड करण्यात आली त्यापैकी ८० टक्के झाडे ही देशी प्रजातीची होती. एकूण २२ हरित पट्टे विकसित करण्यात आले. ११ ठिकाणी विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नगरपालिकेत सायकल दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या दिवशी प्रदूषण करणारी वाहने न वापरता सायकल व पायी चालण्याला प्राधान्य देण्यात आले. शहरात जवळपास ५० पेक्षा जास्त सायकल मोहीम काढण्यात आल्या. लोणावळा येथे अभिनेते सुनील शेट्टी व अभिनेत्री आयेशा झुल्का तर वडगाव येथे अभिनेत्री सायली संजीव यांनी उपस्थित राहून पर्यावरण जागृतीसाठी संदेश दिले. नगरपरिषद क्षेत्रात रांगोळी स्पर्धा, टेरेस गार्डन स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच पथनाट्य, घंटागाडीवर जिंगल्स, सोशल मिडिया होर्डिंग, भिंतीचीत्रे  याद्वारे अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात नदी, तलाव, तळे, नाले यांची स्वछता करण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात एकूण ६० हजार नागरिकांना वैयक्तिकरित्या व २२ हजार सामुहिकरित्या हरित कायद्याचे पालन करण्याबाबत शपथ देण्यात आली. शहरात अपारंपरिक उर्जा प्रकल्प व  सोलर एलईडी लाईट बसविण्यात आली. शहराची प्रदूषण पातळी दरमहा तपासण्यात आली. 

याबाबत सर्व नगरपालिकांचे शासनाचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले होते याबाबत बारामती, लोणावळ, सासवड, वडगाव मावळ नगरपरिषदा अंतिम फेरीत पात्र ठरविण्यात आल्या आहेत.

माझी वसुंधरा अभियानात लोणावळा नगरपरिषदेने ऑक्सीजन जंक्शन, कचरा वर्गीकरण, हवा प्रदुर्षण तपासणी, तलाव संवर्धन सौर ऊर्जा निर्मिती, इलेट्रिकल चार्जिंग पाँईंट तसेच वृक्ष संगोपन दिंडी असे अभिनव उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून लागले आहे.

– श्री सोमनाथ जाधव,मुख्याधिकारी लोणावळा नगरपरिषद

माझी वसुंधरा अभियानात सासवड नगरपरिषदेने देशी जातीचे वृक्षारोपण  केले आहे. सासवड शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग, हवा गुणवत्ता तपासणी, पाणीपुरवठयासाठी सौर ऊर्जेचा वापर तसेच जनजागृतीसाठी 10 हजार नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली आहे.

श्री विनोद झलक, मुख्याधिकारी सासवड

जेजुरी नगरपरिषदे अंतर्गत माझी वसुंधरा अभियानात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत राहावेत,यासाठी पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले आहे. वृषारोपण  तसेच सायकल फेरीचे आयोजनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

श्रीमती पुनम कदम, मुख्याधिकारी जेजुरी

बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून 12 हजार 300 वृक्षलागवड करण्यात आली.  वायू तत्व अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण नऊ ठिकाणच्या हवेच्या नमुन्यांचे परिक्षण करण्यात आले.   शहरांमधील विविध रस्त्यांच्या दुतर्फा हरितीकरण करण्यात आले आहे. जल तत्व अंतर्गत 355 दशलक्ष लिटर आणि 128 दशलक्ष लिटर असे दोन साठवण तलाव कार्यरत असून 165 दशलक्ष लिटर क्षमतेच्या तिसऱ्या साठवण तलावाचे काम प्रगतिपथावर आहे. याचसोबत शहरामध्ये 11.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यरत असून प्रतिदिन 11 दशलक्ष लिटर एकत्रित क्षमतेचे 3 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत.

अग्नी या तत्व अंतर्गत 60 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल नगरपरिषद कार्यालयावर स्थापित करण्यात आले आहेत.     

श्री किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *