SEBI approves the launch of the beta version of T+0 settlement on an optional basis from March 28
२८ मार्चपासून वैकल्पिक आधारावर T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती लॉन्च करण्यास सेबीची मान्यता
मुंबई : आता शेअर बाजारातील नवीन नियमांना सेबी बोर्डाने मान्यता दिली आहे. भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने २८ मार्चपासून T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती पर्यायी आधारावर लाँच करण्यास मान्यता दिली आहे. T+0 सेटलमेंटचा अर्थ असा आहे ज्या दिवशी व्यवहार झाला त्याच दिवशी निधी आणि सिक्युरिटीज सेटल केले जातील. १५ मार्च रोजी झालेल्या सेबी बोर्डाच्या बैठकीत नवीन पर्यायी सेटलमेंट सिस्टमची घोषणा करण्यात आली.
सेबी (SEBI) ने जारी केलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार, बोर्डाने २५ स्क्रिप्सच्या मर्यादित संचासाठी आणि ब्रोकर्सच्या मर्यादित संचासह पर्यायी T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती लॉन्च करण्यास मान्यता दिली आहे.
SEBI ने म्हटले आहे की ते बीटा आवृत्तीच्या वापरकर्त्यांसह पुढील भागधारकांचा सल्ला घेणे सुरू ठेवेल. SEBI ने पुढे म्हटले आहे की बाजार नियामक या अंमलबजावणीच्या तारखेपासून तीन महिने आणि सहा महिन्यांच्या शेवटी प्रगतीचा आढावा घेईल आणि पुढील कारवाईचा निर्णय घेईल. SEBI ने विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (FPIs) व्यवसाय सुलभ करण्याच्या उद्देशाने विविध सवलती मंजूर केल्या आहेत.
सेबीने यापूर्वी २०२१ मध्ये T+1 सेटलमेंट लाँच केली होती, जी अनेक टप्प्यांत लागू करण्यात आली आणि शेवटचा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झाला. तर T+0 सेटलमेंट आता T+1 सेटलमेंटसह पर्याय म्हणून उपलब्ध असेल आणि या नव्या नियमामुळे बाजारात लिक्विडीटी वाढू शकते आणि धोकाही कमी होईल, असा सेबीने विश्वास दर्शवला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “वैकल्पिक आधारावर T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती लॉन्च करण्यास मान्यता”