भारतीय मानक संस्थेने (BIS) बनावट सी फ्लक्स कोअर्ड तारांचे सुमारे 17,000 खोके जप्त केले

BIS seizes around 17,000 fake c-Flux-cored wire boxes in Thane

भारतीय मानक संस्थेने (BIS) बनावट सी फ्लक्स कोअर्ड तारांचे सुमारे 17,000 खोके जप्त केले

मुंबई :  मुंबईच्या भारतीय मानक संस्थेने (BIS) बनावट सी फ्लक्स कोअर्ड तारांचे 17, 703 खोके जप्त केले आहेत.  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे पालन न केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यातBureau of Indian Standards आली आहे.

संस्थेच्या मुंबई शाखा 2 च्या  कार्यालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे IS 15769 अंतर्गत “कार्बन अथवा कार्बन मँगॅनीज स्टील च्या गॅस शिल्डेड व सेल्फ शिल्डेड मेटल वेल्डिंग साठी वापरल्या जाणाऱ्या  फ्लक्स कोअर्ड (ट्यूबुलर)इलेक्ट्रोड तारांच्या” गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे पालन न झाल्याच्या संशयावरून एक तपास आणि छापेमारी मोहीम हाती घेतली होती.

या मोहिमेत मेसर्स अडोर वेल्डिंग लिमिटेड (द्वारा- केरी इंडेव लॉजिस्टिक प्रा. ली. , बिल्डिंग नंबर A -4, ग्लोबल कॉम्प्लेक्स, सर्वे नंबर 25, हिस्सा नंबर 7, 10/1, 10/2 , ग्रामपंचायत कुकसे , भिवंडी – 421302, ठाणे ) यांनी  गुणवत्ता नियंत्रण आदेश एस ओ 1203 (E ) दि. 12.3. 2021 चा भंग केल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येकी एक 1.2 मि मि ची सी फ्लक्स तार असलेले 17, 703 खोके IS 15769 च्या अंतर्गत जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  या अधिकाऱ्यांच्या चमूत  BIS च्या मुंबई शाखा २ च्या  शास्त्रज्ञ- C  निशिकांत सिंग आणि  शास्त्रज्ञ -C आशिष वाकले यांचा समावेश होता.

BIS मानकाचा गैरवापर केल्यास BIS कायदा 2016 अनुसार 2 वर्षांपर्यंत कैद अथवा किमान 2 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. बनावट ISI चिन्हे लावून अनेक उत्पादने चढ्या भावाने ग्राहकांच्या माथी मारली जातात असे अनेकदा दिसून आले आहे. हे टाळण्यासाठी ग्राहकांनी http://www.bis.gov.in या  BIS च्या संकेतस्थळाला भेट देऊन ISI चिन्हाच्या सत्यतेची खातरजमा करूनच उत्पादने विकत घ्यावीत असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *