Pushkar Singh Dhami to continue as CM of Uttrakhand; Pramod Sawant also to lead BJP-led govt in Goa for second straight term
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; तर पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड
डॉक्टर प्रमोद सावंत पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. पणजी इथे भाजपा विधिमंडळ दलाच्या बैठकनंतर केंद्रीय मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉक्टर सावंत पुढची ५ वर्ष गोव्याचा समग्र विकास सुनिश्चित करतील असा विश्वास तोमर यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपा नेते एन. बिरेन सिंह यांनी मणिपुरच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. इम्फाल मध्ये झालेल्या शपथ ग्रहण समारंभात राज्यपाल ला. गणेशन यांनी त्यांना शपथ दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिरेन सिंग यांचं अभिनंदन केलं आहे.
पाच अन्य आमदारांनीही आज काबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यात भाजपाच्या ४ आणि नागा पीपल्स फ्रंटच्या एका आमदाराचा समावेश आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव, केंद्रीय राज्य मंत्री प्रतिमा भौमिक यावेळी उपस्थित होते.
पुष्कर सिंह धामी उत्तराखंड नवे मुख्यमंत्री असतील.आज डेहराडून इथे पक्षाच्या मुख्यालयात विधिमंडळ दलाच्या बैठकित पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली.
केन्द्रीय पर्यवेक्षक म्हणून केन्द्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राज्य मंत्री मीनाक्षी लेखी उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झालं. गोवा विधिमंडळ पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.