Blood Donation Camp’ on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh.
Recognizing the need for blood donation, a ‘Blood Donation Camp’ was organized on Sunday, May 30, 2021, from 9 am to 2 am on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh’s internal-Sambhaji Bhag-Paramahansa Nagar, Mahatma Vasti, and Sahajanand Vasti. The camp was held in the hall of the Mahatma Society.
This was the fifth blood donation camp in Paramahansa. The camp passed with enthusiasm following all the rules of social distance. 102 blood donors donated blood and participated in the charity work of blood donation. It was mainly attended by youth and women.
The camp was inaugurated by Pune Metropolitan Business Head Anandji Kulkarni by worshiping the image of Mother India. Many dignitaries visited this camp and enhanced the beauty of camp. Mayor of Punyanagari Shri Murlidhar Anna Mohol, Khadakwasla MLA Shri Bhimrao Anna Tapkir, Shri Raviji Anaspure, Shri Vikas Anna Raskar, Shri Pandurangji Raut, Shri Yogesh Bappu Pingale, Shri Dilip Vedepatil, Shri Kiran Warpe, Shri Ganesh Warpe, Alp Mr. Navnath Jadhav, Mr. Bala Temkar, Mrs. Harshdatai Farande, Mr. Ashish Kante were present.
Covid’s restrictions hampered the liaison campaign but Sahajanand Prabhat and volunteers from the Eklavya IT Milan branch in the settlement successfully carried out the liaison campaign using the phone and social media.
Many people have not been able to participate in the campaign, despite the ongoing vaccination drive. A total of 138 people had registered for the camp. Some could not donate blood due to medical reasons. So 8 people registered their participation at the time of Ain. Residents of a society registered together and participated as activists.
They thanked the doctors and other staff of Dinanath Mangeshkar Hospital Blood Bank for participating in the camp. The Mahatma Society Executive thanked all the members of the Mahatma Society and all the blood donors for providing the hall for the camp.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘रक्तदान शिबीर ‘.
रक्तदानाची गरज ओळखून रविवार, दिनांक 30 मे 2021 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत-संभाजी भाग-परमहंस नगर, महात्मा वस्ती व सहजानंद वस्ती यांच्या वतीने ‘रक्तदान शिबीर ‘ आयोजित करण्यात आले होते. महात्मा सोसायटीचे सभागृहामध्ये हे शिबीर संपन्न झाले.
परमहंस नगरातील हे पाचवे रक्तदान शिबीर होते. सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून हे शिबीर उत्साहात पार पडले. 102 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाच्या पुण्य कामात सहभाग नोंदवला. प्रामुख्याने युवा वर्ग व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. पुणे महानगर व्यवसायी प्रमुख आनंदजी कुलकर्णी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करून शिबीराचे उदघाटन झाले. या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिबीराची शोभा वाढवली. पुण्यनगरी चे महापौर श्री मुरलीधर अण्णा मोहोळ , खडकवासला आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, श्री रवीजी अनासपुरे, श्री विकास अण्णा रासकर , श्री पांडुरंगजी राऊत , श्री योगेश बाप्पू पिंगळे , श्री दिलीप वेडेपाटील, श्री किरण दगडे, श्री गणेश वर्पे, सौ अल्पना ताई वर्पे, श्री नवनाथ जाधव, श्री बाळा टेमकर, सौ हर्षदाताई फरांदे, श्री आशिष कांटे उपस्थित होते.
कोविड निर्बंधा यामुळे संपर्क अभियान राबविण्यात अडथळा येत होता परंतु वस्तीमधील सहजानंद प्रभात आणि एकलव्य आयटी मिलन शाखेच्या स्वयंसेवकानी फोन आणि सोशल मीडिया वापरून यशस्वी पणे संपर्क अभियान राबवले. सध्या सुरू असलेले लसीकरणामुळे रक्तदान करावे असे वाटत असूनही अनेक जणांना या अभियानात सहभागी होता आले नाही. या शिबिरासाठी एकूण 138 जणांनी नोंदणी केली होती. वैद्यकीय कारणामुळे काही जण रक्तदान करू शकले नाहीत. तर 8 जणांनी ऐन वेळी आपला सहभाग नोंदवला. एका सोसायटीतील राहिवास्यानी एकत्रित नोंदणी केली तसेच कार्यकर्ते म्हणून सहभाग नोंदवला.
या शिबिरात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रक्तपेढी या संस्थेचे सहभागी डॉक्टर व इतर स्टाफ यांचे मनापासून आभार मानले. महात्मा सोसायटी कार्यकारिणीने शिबीरासाठी सभागृह उपलब्ध करून दिले या बद्दल महात्मा सोसायटीच्या सर्व सभासदांचे , तसेच सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले