Launching of Baljeet, a 25-ton bollard pull tug-type vessel
बजीतल या बोलार्ड पुल टग प्रकारच्या जहाजाचे जलावतरण
गुजरातमधील भडोच येथील मे.शॉफ्ट शिपयार्ड कंपनीने बांधलेल्या बलजीत (306 यार्ड) या 25 टन वजनाच्या बोलार्ड पुल टग प्रकारच्या जहाजाचे जलावतरण
नवी दिल्ली : गुजरातमधील भडोच येथील मे.शॉफ्ट शिपयार्ड कंपनीने बांधलेल्या बलजीत (306 यार्ड) या 25 टन वजनाच्या बोलार्ड पुल (बिपी) टग या जहाजाचे 10 मार्च 2024 रोजी सीएमडीई रजत नगर, डब्ल्यूपीएस (एमबीआय)यांच्यातर्फे जलावतरण करण्यात आले. हे जहाज केंद्र सरकारच्या “मेक इन इंडिया” उपक्रमाचे अभिमानी ध्वजवाहक आहे.
ह्या जलावतरणामुळे केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाला अनुसरुन मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (M/s SSPL), या एमएसएमई क्षेत्रातील कंपनीशी करण्यात आलेला एकूण तीन 25 टन वजनी जहाजांची उभारणी तसेच वितरणाचा करार पूर्ण झाला आहे. या जहाजांची बांधणी भारतीय जहाजबांधणी प्रबंधनाच्या (आयआरएस) नियमांतर्गत करण्यात आली आहे. नौदलाच्या जहाजांना तसेच पाणबुड्यांना बर्थिंग तसेच अन-बर्थिंग, त्यांना वळवणे, मर्यादित स्वरूपाच्या जलाशयांमध्ये हालचाल करणे यासाठी या जहाजाची मदत उपलब्ध झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या परिचालनविषयक वचनबद्धतेला चालना मिळेल. तसेच नांगर टाकलेल्या जहाजांना हे जहाज अग्निशमन यंत्रणेची मदत पुरवू शकेल तसेच मर्यादित स्वरूपाच्या शोधमोहीमा तसेच बचाव कार्य यांच्यात देखील भाग घेऊ शकेल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “बजीतल या बोलार्ड पुल टग प्रकारच्या जहाजाचे जलावतरण”