Busting the Misconception of the covid 19 Vaccination.
There have been some media reports, quoting recent studies, that it would be better to shorten the gap between two doses of the COVISHIELD vaccine, in light of the variants in circulation. Dr V K Paul, Member (Health), NITI Aayog has assured that there is no need for panic on the need for an immediate change in the dosage interval. Dr Paul was addressing the media briefing on COVID-19, at National Media Centre, PIB Delhi today.
He has stated that “There is no need for any panic, suggesting the need for immediate switchover or change in the gap between the doses. All these decisions must be taken very carefully. We must remember that when we increased the gap, we had to consider the risk posed by the virus to those who have received only one dose. But the counterpoint was that more people will then be able to get the first dose, thereby giving a reasonable degree of immunity to more people.” Dr Paul further added that “We need to balance these concerns. So, please remember, that we need to necessarily have this debate and discourse in the public domain; however, the decision has to be taken by appropriate fora comprising eminent people who are knowledgeable about this.
No need for immediate change in COVISHIELD dosage interval: Member, NITI Aayog
“Let us adopt due scientific process and respect the decision taken by NTAGI”
“Covishield Vaccine Doses Gap Reduction requires proper scientific study in the context of our country’s scenario”
Member (H), Niti Aayog informed that “In our National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI), there are quite a few people who have been a part of WHO panels and committees and are globally renowned and recognized for their eminence. Moreover, NTAGI is regarded as a standard when it comes to global and national immunization programmes. So, please respect their decisions.”
Welcoming a discourse on this topic, Dr Paul has highlighted the need for due scientific process in arriving at such decisions; he has appealed to the public to respect the decision taken by NTAGI, a body of globally renowned experts. “Let the decision regarding dose interval be examined by NTAGI, as per due process. The United Kingdom must have adopted due process and examined data scientifically, to revise their previous decision regarding the gap. The UK had earlier kept the gap at 12 weeks, but as per data available to us, we did not consider it safe at that point. So, let us entrust this to our scientific fora, they must be addressing it already. They will review it based on the pandemic situation in our country, depending on the extent of prevalence of the delta variant in our country and then take a comprehensive view. Whichever decision is taken by our scientific community, we will honour it.”
लसीकरणाबद्दलच्या गैरसमज दुर करणे आवश्यक.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाचा दाखला देणारे प्रसारमाध्यमातील काही अहवाल असे सांगतात की, ‘विषाणूचे निरनिराळे प्रकार पाहता, कोविशील्डच्या मात्रांमधील अंतर कमी करणे इष्ट ठरेल.’ मात्र, नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी आश्वासकपणे असे सांगितले आहे की, “मात्रांमधील अंतर तातडीने कमी करण्यावरून चिंतित होण्याची आवश्यकता नाही.” ते नवी दिल्लीत राष्ट्रीय माध्यम केंद्रात कोविड -19 विषयी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, “चिंतित होत मात्रांमधील अंतरात तातडीने बदल सुचवण्याची आवश्यकता नाही. हे सर्व निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. आपण जेव्हा अंतर वाढविले, तेव्हा एकच मात्रा टोचून घेतलेल्यांना विषाणूमुळे असणाऱ्या धोक्याचाही आपण विचार केला होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मात्र यापेक्षा आणखी महत्त्वाचा मुद्दा असा होता की, अधिक लोकांना पहिली मात्रा देता येईल, जेणेकरून अधिक लोकांना थोडीतरी प्रतिकारशक्ती मिळेल.”
डॉ. पॉल यांनी असेही सांगितले की, “या विचारांमध्ये समतोल राखला पाहिजे. त्यामुळे कृपया हे जरूर लक्षात ठेवा, की सार्वजनिक रीत्या यावर चर्चा आणि विचारविनिमय झालाच पाहिजे; परंतु निर्णय मात्र याबद्दलचे ज्ञान असलेल्या व्यक्तींच्या उचित मंचानेच घेतला पाहिजे.”
कोविशील्डच्या मात्रांमधील अंतरात तातडीने बदल करण्याची गरज नाही-: सदस्य, नीती आयोग
“उचित वैज्ञानिक प्रक्रियेचा अंगीकार करून लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या निर्णयाचा आदर करूया”
“कोविशील्डच्या मात्रांमधील अंतर कमी करण्यासाठी आपल्या देशाच्या परिस्थितीनुसार योग्य शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक”
नीती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी अशीही माहिती दिली की, “आपल्या NTAGI(National Technical Advisory Group) म्हणजे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटामध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या समित्यांचे सदस्य असलेल्याही काही व्यक्ती आहेत. ज्ञान,अनुभव आणि ज्येष्ठतेच्या नात्याने,ते स्वतःच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत. शिवाय, जागतिक आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांच्या संदर्भात NTAGI ला विशेष गुणवत्तापूर्णतेचा मान आहे. त्यामुळे कृपया त्यांच्या निर्णयांचा आदर करा.”
या विषयावर होत असलेल्या चर्चेचे स्वागत करत डॉ.पॉल यांनी, असे निर्णय घेताना उचित वैज्ञानिक प्रक्रियेचा अंगीकार करण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या NTAGI ने घेतलेल्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. “मात्रांमधील अंतराचा निर्णय NTAGI ला उचित प्रक्रियेद्वारे तपासून पाहूद्या. युनायटेड किंग्डमने (यूके) त्यांचा जुना निर्णय बदलण्यासाठी उचित प्रक्रिया पार पाडून प्राप्त माहितीचे शास्त्रशुद्ध परीक्षण केले असावे. यूकेने पूर्वी मात्रांमध्ये 12 आठवड्यांचे अंतर ठेवले होते. मात्र, आपल्याला उपलब्ध माहितीनुसार आम्हाला ते त्यावेळी सुरक्षित वाटले नाही. म्हणून आपल्या वैज्ञानिकांनी त्यावर आधीच विचारविनिमय सुरु केला असेल हे लक्षात घेऊन आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून शांत राहूया. आपल्या देशातील महामारीच्या स्थितीनुसार, आपल्या देशातील डेल्टा प्रकारच्या प्रादुर्भावाच्या स्थितीनुसार सर्वंकष विचार करून ते त्यात बदल करतील. आपल्या शास्त्रज्ञांचा जो काही निर्णय असेल, त्याचा आपण सन्मानच करू.” असे डॉ.पॉल यांनी सांगितले.