Candidates of classes X and XII will be able to appear for the exam even if they are obstructed by corona
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थीला कोरोनाची बाधा झाली असतानाही परीक्षा देता येणार
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या एखाद्या परीक्षार्थीला कोरोनाची बाधा झाली असतानाही परीक्षा देता येणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी यासाठी राज्य मंडळाने परीक्षार्थीना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत,
त्यानुसार जर एखाद्या परीक्षार्थीस परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान जर कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने काही त्रास झाल्यास आणि त्याला जर परीक्षा द्यायची इच्छा असल्यास परीक्षार्थ्याच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
तत्पूर्वी त्याबाबत केंद्र संचालकांना आधी सूचना द्यावी लागणार आहे.
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रामार्फत जवळील शासकीय आरोग्य केंद्राकडून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा संबधित परीक्षार्थीस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच प्रत्येक केंद्रावर सर्व परीक्षार्थिनी थर्मल स्क्रीनिंगसाठी किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावे तसेच परीक्षर्थिनी एकमेकांचे परीक्षा साहित्य न वापरता स्व:ताचे साहित्य स्व:त आणावे असेही असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.