Chandni Chowk flyover will be inaugurated by Minister Nitin Gadkari on August 12
१२ ऑगस्ट रोजी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहाणी
उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा!
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपाचे गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतायरीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांना दिली.
पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच , कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या..
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “१२ ऑगस्ट रोजी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार”