Changes in drug delivery rules for Injection & drug on mucormycosis.
Patients with mucormycosis are flocking to the district surgeon’s office for injections and medication. Therefore, the District Collector’s Office decided to stop the distribution from the office to private hospitals. Accordingly, only government patients will be supplied to the hospitals by the District Surgeon’s Office and the remaining stock of medicines will be distributed by the District Office to the private hospitals. As the number of patients with mucormycosis is increasing, injection drugs should not be black marketed so it is being distributed to private hospitals under the control of the District Collector’s Office.
The District Surgeon Distributed it to government hospitals. After maintaining an adequate supply of medicines for patients undergoing treatment under government hospitals and Mahatma Phule Jan Arogya Yojana, as the number of patients with mucositis in government hospitals is relatively low, it was earlier decided to give the remaining stocks to private hospitals by the District Surgeon’s Office. The District Integrated Health and Family Welfare Society was instructed to pay the cost of the injection as per the fixed price. However, due to the crowd of relatives of the District Surgeon’s Office, it was decided to cancel the decision and distribute the remaining stock of medicines from the District Surgeon’s Office to the District Collector’s Office. The stock of medicines will be sent to the District Collector’s Office by the District Surgeon’s Office every morning at eleven o’clock and it will be distributed to the private hospitals by the District Collector’s Office.
म्युकर मायकोसिस वरील इंजेक्शन, औषध वितरण नियमात बदल.
म्युकर मायकोसिस च्या रुग्णांना इंजेक्शन आणि औषधी साठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे आता कार्यालयातून खाजगी रुग्णालयांना करण्यात येणारे वितरण बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून केवळ सरकारी रुग्णांना रुग्णालयांना पुरवठा केला जाणार असून, या कार्यालयाकडे शिल्लक राहणार औषधी साठा औषधांचा जिल्हाधिकार्यालय कडून खासगी रुग्णालयांना वितरित होणार आहे.
म्युकर मायकोसिस च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंजेक्शन औषधांचा काळाबाजार होऊ नये, म्हणून खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली वितरण करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून वितरण केले जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिस रुग्ण तुलनेत कमी असल्याने सरकारी रुग्णालय आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशा औषधाचा पुरवठा राखून ठेवल्या नंतर, उर्वरित साठा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून खाजगी रुग्णालयांना देण्याचे पूर्वी ठरविण्यात आले . निश्चित केलेल्या किमतीनुसार इंजेक्शन ची किंमत रक्कम डिस्टिक इंटिग्रेटेड हेअल्थ अंड फॅमिली वेल्फेअर सोसायटी यांच्याकडे करण्याची सूचना करण्यात आली होती . मात्र जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांच्या नागरिक नातेवाईकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय रद्द करून जिल्हा शिक्षित शल्यचिकित्सक कार्यालय कडील शिल्लक औषधसाठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दररोज सकाळी अकरा वाजता औषधी साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे तो खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरित होणार आहे.