Final order issued regarding changes in parking arrangements
पार्किंग व्यवस्थेतील बदलांबाबत अंतिम आदेश जारी
लोणी काळभोर वाहतूक विभागाअंतर्गत शंभो स्नॅक्स ते एम.आय.टी. महाविद्यालयापर्यंत नो पार्किंग
पुणे : पुणे शहर वाहतूक विभागाच्यावतीने शहरातील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
त्यानुसार येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाअंतर्गत येणारे वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राच्या समोरील मुख्य रस्त्यावर भरणा केंद्राच्या गेटच्या उजव्या बाजूस १०० मीटर व डाव्या बाजूस १०० मीटर अंतरावर तसेच बंडगार्डन वाहतूक विभागाअंतर्गत किराड चौक ते अलंकार चौक, अलंकार चौक ते आय.बी. चौक आणि साधु वासवाणी चौक ते विधानभवन चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.
लोणी काळभोर वाहतूक विभागाअंतर्गत कॅफे मिलन ते महामार्ग अंडरपासपर्यंत तसेच डी. के. वाईन्स ते एम.जी. वेफर्स अॅन्ड बाईट्सपर्यंत सेवा रस्त्यांवर आणि शंभो स्नॅक्स ते एम.आय.टी. महाविद्यालयापर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस स्टेशन इमारतीच्या उत्तर बाजूकडील पायऱ्यापर्यंत १०० फूट सेवा रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजू व भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस स्टेशन इमारतीच्या उत्तर बाजूकडील भिंतीच्या टोकापर्यंत पूर्वेकडील बाजू नो पार्किंग करण्यात येत आहे.
भारती पोलीस स्टेशन इमारतीच्या पायऱ्यापासून पुढे पोलीस स्टेशनच्या उत्तर बाजूकडील भिंतीचे टोकापर्यंत पोलीसांची सरकारी चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी खुणा (मार्किंग) करून जागा आरक्षित करण्यात येत आहे. त्यापासून पुढे चैतन्यनगरकडे डावीकडे वळणाऱ्या रस्त्याच्या टोकापर्यंत दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता पी-१ पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. त्यामध्ये ५० फूट अंतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खाजगी दुचाकी वाहने पार्क करण्याकरीता आरक्षित करण्यात येत आहे.
तीन हत्ती चौकाकडून संभाजीनगरकडे, तळजाई स्मशानभूमीकडे तसेच शनीमंदीर, पद्मावतीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पार्किंग व्यवस्थेतील बदलांबाबत अंतिम आदेश जारी”