देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ

Employee State Insurance Corporation (ESIC) हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Commencement of chemotherapy services in 30 ESIC hospitals across the country

देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ

नवी दिल्‍ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील ईएसआयसी(कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191 व्या बैठकीत देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ केला.Employee State Insurance Corporation (ESIC) हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या सेवेचा प्रारंभ हे देशाच्या अमृत काळात आपल्या श्रमयोगींच्या सर्वांगीण कल्याणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल असल्याचे यादव याप्रसंगी म्हणाले. ईएसआयसी रुग्णालयांतर्गत केमोथेरपी सेवा सुरू झाल्यामुळे, विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावरील अवलंबित कुटुंबीयांना कर्करोगावर अधिक चांगले उपचार सुलभ होतील.

केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयसीच्या डॅशबोर्डसह नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन केले. ईएसआयसी रुग्णालयांमधील संसाधने आणि खाटा, चालू बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती इत्यादींवर अधिक चांगली देखरेख डॅशबोर्डमुळे सुनिश्चित होईल.

ईएसआयसी रुग्णालयांमध्ये कुशल वैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कार्य पुढे नेण्याचा निर्णय ईएसआयसीने घेतला आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

आवश्यकतांचे आकलन केल्यानंतर नवीन ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये स्थापन केली जातील. आतापर्यंत, 8 वैद्यकीय महाविद्यालये, 2 दंत महाविद्यालये, 2 नर्सिंग कॉलेज आणि एक पॅरा-मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात आली असून ती ईएसआयसीकडून चालवली जात आहेत, असे यादव यांनी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
वस्तू व सेवा कर चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यावर धडक कारवाई
Spread the love

One Comment on “देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *