The naming of Government Medical College and Hospital at Satara as ‘Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College and Hospital, Satara’
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण
– मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली .
सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संस्थेचे नामाधिकरणाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून त्यानुषगांने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई करीत असल्याचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी सांगितले .
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण”