Chhatrapati Shahu Maharaj National Research Scholarship for M.Phil / PhD through Sarathi Sanstha.
The meeting of the Board of Directors of Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (Sarathi), Pune was held yesterday. Concluded June 1, 2021. The following important decisions were taken in this meeting. Due to the special efforts of Deputy Chief Minister Ajit Pawar, 4163 sq.m. land has been allotted in CSN 173/1B at Shivajinagar Bhaburda in Pune city for the headquarters building of Sarathi Sanstha. The staff of 41 officers/employees of the organization was appointed by the Government of Maharashtra. A resolution congratulating the Deputy Chief Minister of Maharashtra Ajit Pawar was passed in the meeting of the Board of Directors.
Instructions were given to select all the 207 students present for the Chhatrapati Shahu Maharaj National Research Scholarship (CSMNRF-2020) interview for M.Phil / Ph.D. through Sarathi Sanstha. Also, 34 absent candidates were given one more chance to be interviewed. Approximately 500 vacancies were declared every year for the posts of Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted) Assistant Cell Officer, Sales Tax Inspector, and Sub-Inspector of Police organized by the Maharashtra Public Service Commission. For this, through Sarathi, Pune, a policy was decided to provide free online training to all eligible applicants by inviting online applications from the target group candidates for the Joint (East) and (Main) examinations for Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted). The Staff Selection Commission, the Central Staff Selection Commission, has announced about 20,000 vacancies for non-Gazetted (Group B and Group C) posts in the year 2020-21. For this, through Sarathi, Pune, through the Central Staff Selection Commission, a policy was decided to provide free online training to all eligible applicants by inviting online applications from the target group candidates for pre-examination preparation for non-Gazetted (Group B and Group C) posts.
Executive Engineer, Deputy Engineer, Junior Engineer are selected through the Maharashtra Engineering Services examination conducted by Maharashtra Public Service Commission. These examinations are held every year. For this, a policy was decided to train 250 candidates in the target group through pre-examination, main examination and interview for the coaching of Maharashtra Engineering Service Competitive Examination (CET) through Sarathi Sanstha.
In the year 2020, 74 vacancies were announced for the Maharashtra Judicial Service Competitive Examination (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) organized by the Maharashtra Public Service Commission. For this, a policy has been decided to train a total of 400 candidates in the target group through the entrance test (CET) for coaching of Maharashtra Judicial Service Competitive Examination through Sarathi Sanstha at Mumbai, Pune, Aurangabad, and Nagpur.
Maharashtra Public Service Commission Competitive Examination Coaching Team sponsored by Sarathi, Pune decided to give three months scholarship based on coaching and attendance total Rs. 24000 / – or lump sum financial assistance of Rs. Came. Students can choose any one of these financial benefits options according to their own preferences.
Sarathi, a slogan competition was held for the organization. 948 people participated in it. The deadline for submission by email was 26/04/2021, and the slogan should be in full Marathi and up to a maximum of 7 words. Among the slogans invited, the Board of Directors chose the slogan “Shahu Vicharna Devuya Gati, Sadhuya Sarvangin Pragati”. This slogan Shri. Jagdish was sent by Vishnu Dalvi, so as per the criteria of the competition, he will be given a check of Rs. 10,000 / – by Sarathi Sanstha http://sarthi-maharashtragov.in/
सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीएच.डी करिता “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची संचालक मंडळाची बैठक काल दि. 1 जून 2021 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील सी.स.नं १७३/१ब मधील ४१६३ चौ.मी जमीन मिळाली आहे. संस्थेस ४१ अधिकारी/कर्मचाऱ्यांचा स्टाफ महाराष्ट्र शासनाने दि. ०४ मे २०२१ रोजी मंजूर केला असून त्या मुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.
सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीएच.डी करिता “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण २०७ विद्यार्थ्याची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच, ३४ अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एकदा अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दर वर्षी अंदाजे ५०० रिक्त जागा घोषित होत्या. यासाठी सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पूर्व) व (मुख्य) परीक्षांसाठी लक्षीत गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांसाठी सन २०२०-२१ मध्ये अंदाजे २०,००० रिक्त पदे जाहीर झाली. यासाठी सारथी, पुणे मार्फत केंद्रीय कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदाराना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील २५० उमेदवारांना पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन २०२० मध्ये ७४ रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण ४०० उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी २०१९-२० मधील MPSC पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण रु.२४०००/- अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य रु.१५०००/- देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार निवड करू शकतात.
सारथी, संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्या आली होती. त्यात ९४८ जणांनी सहभाग नोंदविला या मध्ये दि. २६/०४/२०२१ पर्यंत इ-मेलद्वारे सादर करण्याची मुदत होती, तसेच हे घोषवाक्य पूर्ण मराठीत असणे व जास्तीत जास्त ७ शब्दापर्यंत असणे अनिवार्य होते. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यां पैकी संचालक मंडळाने “शाहू विचारांना देवूया गती, साधूया सर्वांगीण प्रगती” या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य श्री. जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते, त्यामुळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फ त्यांना रक्कम रु १०,०००/- धनादेश देण्यात येणार आहे. http://sarthi-maharashtragov.in/