Savitribai Phule Pune Vidyapatha international students celebrate Christmas and New Year at International Centre
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची पर्वणी
आंतरराष्ट्रीय केंद्रात नाताळ आणि नवीन वर्ष साजरे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्रात नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यात आले. कुलगुरू प्रा.(डॉ). सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. याप्रंसगी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ). पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा.(डॉ). विजय खरे उपस्थित होते.
विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आंतराराष्ट्रीय विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. आपल्या घरापासून, देशापासून लांब राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराची, देशाची आठवण येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र नेहमी विविध देशात साजरे केले जाणे सण-उत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कुलगुरू, प्र-कुलगुरू, केंद्राचे संचालक यांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून ख्रिसमस ट्री सजवली. तसेच केक कापून नाताळ साजरा केला. या प्रसंगी विद्यार्थ्यीनीने कॅरल सिंगिंग करत वातावरण ‘नाताळमय’ केले. त्यानंतर सांताने मान्यवरांसह उपस्थित सर्वांना भेटवस्तू दिऊन नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काही आंतराराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतराराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपले दुसरे घर वाटावे यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा.(डॉ). विजय खरे म्हणाले. तसेच या विद्यार्थ्यांमध्ये आपापसात मैत्री व्हावी, त्यांच्यातील टॅलेंटला वाव मिळावा म्हणून येत्या महिन्यात यूथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यात विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फुड फेस्टिवलचाही समावेश असेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची पर्वणी”