Citizens should not be ignorant of the potential third wave of the coronavirus.

Citizens should not be ignorant of the potential third wave of the coronavirus. 

Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the corona outbreak situation and measures in the Pune district.                   –

 Crowds of citizens have been on the rise since restrictions under Break the Chain were relaxed. However, the threat of corona is not over yet, so the citizens should not be indifferent considering the possible threat of the third wave of the corona, said Deputy Chief Minister Ajit Pawar. He said there were plans to tighten restrictions on Saturdays and Sundays in view of the growing crowds.

 A review meeting on Corona situation and measures in the district was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar at Council Hall. At this time Shri. Pawar said the congestion has started increasing after the restrictions were relaxed in the urban areas of the district. Citizens need to be more careful considering the possibility of a third wave of the next corona. Corona patient rates in the district have been declining this week. So it was decided to relax the restrictions. But now the crowds in public places seem to be growing. Citizens should leave only if they need to. Although the administration has made possible preparations considering a possible third wave of the corona, citizens must follow the necessary rules. Planning to vaccinate 1.5 lakh citizens daily in the district as soon as vaccine becomes available from the Central Government.

Ajit Pawar Dy CM
Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the corona outbreak situation and measures in the Pune district.

At least one oxygen plant will be operational in each taluka of the district.

 

Appointment of Taluka wise Pediatrician.

 

Considering the crowd of citizens, the idea of ​​tightening the restrictions on Saturday and Sunday.

 

Special attention will be given to patients with myocardial infarction.

 

Deputy Chief Minister Ajit Pawar

 

 At least one oxygen plant should be commissioned in each taluka of the district as soon as possible. At present 15 oxygen plants are in operation in the district and the work of 39 oxygen generation plants is in progress. Preparations have been made to ensure that there is no shortage of oxygen in rural areas.

 Work is underway to train CHOs, Asha workers, ANMs, Anganwadi workers, health assistants in rural areas in connection with the third wave of potential covid. Considering the danger to children in the third wave, action is being taken to appoint trained paediatricians in each taluka. The administration has been instructed to pay special attention to the mucormycosis patients in the district. It is also necessary to follow the guidelines prepared by the government regarding Mucorrhea. 

 Mr Pawar also said that the police administration needs to take proper precautions to control the growing crowds, adding that regular surveys of ILI and sari patients, more focus on super spreaders, increasing rapid antigen tests in hotspots, enhanced infrastructure in the second wave, Reserving 10 per cent beds for young children in DCH, ensuring the arrangement of oxygen beds in all hospitals. Also, education and public awareness is being done in view of the third wave. Mr Pawar also said that after the large supply of vaccines from the central government, a plan has been made to vaccinate 1.5 lakh people in the district every day.

 At this time, Dr Subhash Salunke said that the intensity of the third wave in the state is likely to depend on vaccination. Therefore, more and more citizens need to be vaccinated. About 25 per cent of the total patients in the third wave are estimated to be admitted to government hospitals. About 50 per cent of patients may need hospital care.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहु नये . 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा.

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहु नये व जास्तीत जास्त दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाढती गर्दी लक्षात घेता शनिवार, रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी श्री. पवार म्हणाले, जिल्हयातील शहरी भागात निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवडयात जिल्हयातील कोरोनाचा रुग्ण दर कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता  सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. 

जिल्हयात प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक तरी ऑसिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वीत करावा. सध्या जिल्हयात 15 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वीत असून 39 ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी तयारी केली आहे. 

Ajit Pawar Dy CM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हयातील
कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा.

 

केंद्र सरकार कडून लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन.

 

जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वीत करणार.

 

तालुकानिहाय बालरोग तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती.

 

नागरिकांची गर्दी लक्षात घेता शनिवार रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार.

 

म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष देणार.

 

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 संभाव्य कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सीएचओ, आशा वर्कर्स, एएनएम, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित बालरोग तज्ञ नियुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. जिल्हयात म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच म्युकरमायकोसिस बाबत शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. 

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.पवार यांनी सांगून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आयएलआय आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, सुपर स्प्रेडर्स वर अधिक लक्ष, हॉटस्पॉट मध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवणे, दुसऱ्या लाटेमध्ये वाढवलेले इन्फ्रास्ट्रक्चर तयार ठेवणे,सर्व डीसीएच मध्ये 10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवणे, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लोक शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्या नंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन झाल्याचेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ.सुभाष साळुंके यांनी सांगितले राज्यातील तिसऱ्या लाटेची तीव्रता लसीकरणावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी साधारण 25 टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा अंदाज आहे. साधारण 50 टक्के रुग्णांना रुग्णालयीन सेवेची आवश्यकता भासू शकेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *