Food festival exhibition and sale through Pune Municipal Corporation Community Development Department
पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत खाद्यमहोत्सव प्रदर्शन व विक्री
पुणे : पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिला बचत गट खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन दि. १९/१/२०२४ ते दि. २१/१/२०२४ या कालावधी मध्ये करणेत आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १९/१/२०२४ रोजी मा. श्री. विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका यांचे शुभहस्ते पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे येथे सपंन्न झाले.
या प्रसंगी मा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी पुणे शहरात विविध वस्तू उत्पादीत करणारे ६००० महिला बचत गट असल्याचे सांगून पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण योजनांबद्दल माहिती दिली. पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील ठराविक रक्कम महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरणे बंधनकारक असलेचे त्यांनी नमूद करून या योजनांचा लाभ सर्व महिला वर्गांनी घेणेबाबत तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करणेत येत असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेणेबाबत आव्हान केले.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त मा.डॉ. श्री. कुणाल खेमनार यांनी महिला सक्षमीकरणअंतर्गत महिला बचत गटांकरीता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटींगचे नियोजन इ-कॉमर्स चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाईल ॲप्लिकेशन यांचे माध्यमातून करणेत येणार असल्याचे नमूद केले व यामध्ये जास्ती जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले.
या कार्यक्रम प्रसंगी परिमंडळ क्र. ३ चे उप आयुक्त मा. श्रीमती आशा राऊत, उद्यान विभाग प्रमुख मा. श्री. अशोक घोरपडे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त मा. श्री. संदीप खलाटे, समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी मा. श्री. रामदास चव्हाण, तसेच समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
उप आयुक्त मा. श्री. नितिन उदास,यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. संदीप कोळपे सहा. समाज विकास विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रामदास चव्हाण , मुख्य समाज विकास अधिकारी यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “समाज विकास विभागामार्फत खाद्यमहोत्सव प्रदर्शन व विक्री”