Confusion about Twelfth (HSC) exam.

Confusion about Twelfth (HSC) exam.

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has not received any notification from the school education department as to when the Class XII examination will be held, which has increased the confusion among students, parents, and teachers. Due to Corona, it is decided to postpone the Class XII exams from April 23 to May 21. 

 14 lakh students have registered for the Class XII examination. The state is facing a corona crisis and exams are not likely to be held in May, so there is confusion over when and how the exams will be held. No notice has been issued by the school education department on whether the exams will be held in late May or June.

Meanwhile, the Maharashtra State Council for Educational Research and Training (SCERT) has already released a set of questions for the Higher Secondary Certificate (HSC) examinations in the month of  April.  Subject-wise question sets/bank  for students appearing for the upcoming board exams, 2021 are available at https://maa.ac.in

 These query sets are available in English, Marathi, and Urdu medium. Covid-19 has caused educational losses in epidemic diseases all over the country. Maharashtra Board has already reduced the syllabus of board exams by 25 percent. These question sets are based on a reduced curriculum.

In the current situation, it is not safe to take a high school certificate exam considering the increasing incidence of coronavirus. The Central Board of Secondary Education (CBSE) will review Corona’s situation in the first week of June and decide on the Class XII examination. Therefore, the question is whether the Maharashtra State Board is also waiting for the decision of the CBSE.  Meanwhile, there is a demand from some students to take the exam online. Given the number of students, it is not possible to take the exam online.

बारावी (HSC)परीक्षेबाबत संभ्रमावस्था . 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचे परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना आलेले नाही यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या संभ्रमात वाढ झाली आहे.  कोरोनामुळे  23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  

बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  राज्यात कोरोनाचे संकट कायम असून मे महिन्यात परीक्षा होणे शक्य नाही,  त्यामुळे परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने  घेण्यात येतील याबाबत संभ्रम आहे.  परीक्षा मेअखेर किंवा जून मध्ये होणार यावर कोणतीही सूचना शालेय शिक्षण विभागाने काढलेली नाही. 

दरम्यान दरम्यान,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) ने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षांसाठी  एप्रिलमध्ये  प्रश्न संच  जाहीर केला  आहे. येत्या बोर्डाच्या परीक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विषयवार प्रश्न संच २०२१ https://maa.ac.in वर उपलब्ध आहेत  

 हे प्रश्न संच इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यम या तीन भाषांमध्ये  उपलब्ध आहेत .  कोविड -१९ मुळे  सर्व देशभर साथीच्या आजारात शैक्षणिक नुकसान झाल्याने.  महाराष्ट्र मंडळाने यापूर्वीच बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी केला आहे.  हे प्रश्न संच  कमी झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे तयार करण्यात आल्या आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या विचारात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा घेणे सुरक्षित नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  CBSE  जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या  परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता बारावीच्या परीक्षा बाबत निर्णय घेणार आहे.  त्यामुळे महाराष्ट्र राज्य मंडळ देखील सीबीएसईच्या निर्णयाची वाट पाहत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे मागणी काही   विद्यार्थ्यांकडून होत आहे,  विद्यार्थी संख्या बघता ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसून परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे राज्य मंडळाने आधीच शिक्कामोर्तब केले आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *