Confusion of 12th standard exams persists.
Due to the outbreak of corona, the Department of School Education postponed the Class XII examinations. However, there is still confusion among students, parents, and teachers as to when these exams will be held. Regarding the 12th standard examination. The education department should publish detailed information on the 12th Exams.
Due to the growing problem of corona in the state, the education department canceled the state board’s Class X examination and decided to postpone the Class XII examination till the end of May. This was informed by Education Minister Varsha Gaikwad a few days ago. However, the prevalence of corona is high in the state and it is not possible to take the test in June. Therefore, many are skeptical about when and how to conduct this test. Students need a period of at least one month before the exam to prepare for the final stage of the exam. No notice has been given by the school education department as to whether the examination will be held at the end of May or in June. The state government has already extended the lock-down till June 1, So students will not be able to take the exam by the end of May.
Due to increasing cases of Coronavirus, among many students of CBSE Class 12, demanding the cancelation of Class 12 Board Exams 2021. Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank will meet virtually all state education secretaries on Monday 17th May. The decision regarding the cancellation of CBSE Class 12 Board Exams 2021 might be taken in the meeting. The Union Minister will also discuss the COVID-19 pandemic and its impact on Education, Promotion of Online Education, and Implementation of New Education Policy, etc.
In such a situation, the demand from the parents is that the school education department should address the issue of examinations in the state. Some parents say that exams should be taken online just like the academic year. There is no discussion between the school education department and the state board regarding the 12th standard examination at present.
बारावीच्या परीक्षांचा गोंधळ कायम, काय होणार बारावीच्या परीक्षांचे?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभाग शिक्षण विभागाने, इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत याबाबत अजूनही विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम आहे. बारावीच्या परीक्षेच्या बाबत शिक्षण विभागाने सविस्तर माहिती सूचना प्रसिद्ध कराव्यात अशी त्यांची मागणी आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्या संसर्गामुळे शिक्षण विभागाने राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यावर ची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून जून महिन्यात परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. परीक्षा साठी शेवटच्या टप्प्यात तयारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी किमान एक महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार की जूनमध्ये होणार याबाबत कोणतीही सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली नाही. राज्यात सरकारने लॉक डाउन १ जून पर्यंत वाढवला आहे, त्या मुळे मे महिन्याच्या अखेरीस परीक्षा होऊ शकणार नाही .
कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे CBSE इयत्ता 12 वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी 12 बोर्ड परीक्षा 2021 रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंकसोमवारी १७ मे ला ऑनलाईन सर्व राज्य शिक्षण सचिवांची मिटिंग घेतील. कदाचीत CBSE इयत्ता 12 बोर्ड परीक्षा 2021 रद्द करण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात येईल. या बैठकीत केंद्रीय मंत्री COVID १९ च्या साथीचा शिक्षणावरील परिणाम, ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन आणि नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी इत्यादी विषयावर देखील चर्चा करतील.
अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील परीक्षांचा प्रश्न सोडवावा अशी पालकांची मागणी आहे. काही पालकांचे म्हणणे आहे की शैक्षणिक वर्षाप्रमाणेच परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात. शालेय शिक्षण विभाग आणि राज्य बोर्ड यांच्यात सध्या बारावीच्या परीक्षे संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही.