शैक्षणिक, शासकीय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी

District level workshop under National Tobacco Control Program राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

The Cigarettes and other Tobacco Products Act 2003 (COTPA 2003)should be strictly implemented to make educational and government institutions tobacco-free

शैक्षणिक, शासकीय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी – डॉ. प्रशांत वाडीकर

डिसेंबर अखेर सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा गुटखा जप्त

पुणे : जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा परिमंडळचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी दिल्या.District level workshop under National Tobacco Control Program राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, नोडल अधिकारी डॉ. राहुल पिंपळकर, जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत, समिती सदस्य उपस्थित होते.

श्री. वाडीकर म्हणाले, तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेवून विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या तबांखूमुक्त शाळा उपक्रमाला गती द्यावी.

यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला. श्री. हाडे यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेर ४९ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून ८ हजार २१९ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २८ तंबाखू नियंत्रण कक्षांमार्फत ४ हजार ४९९ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने ४६३ नागरिकांवर कारवाई करुन ५ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून ४०४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ७ नागरिकांवर कारवाई करुन ७०० रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

डिसेंबर अखेर सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा गुटखा जप्त

ग्रामीण आणि शहर पोलिसांनी २०२३-२४ मध्ये डिसेंबर अखेर अन्न व औषध अधिनियमाखाली ५ कोटी ४५ लाख ६३ हजार १५३ रकमेचा गुटखा आणि कोटपा कायद्याअंतर्गत ८२ हजार ६५८ रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने २४ प्रकरणात कारवाई करुन १ कोटी ४४ लाख ९ हजार ४६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
आभासी मराठी साहित्य संमेलनाचे २० व २१ जानेवारी रोजी आयोजन
Spread the love

One Comment on “शैक्षणिक, शासकीय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *