COVID-19 Vaccination of citizens in the age group of 30 to 44 years

COVID-19 Vaccination of citizens in the age group of 30 to 44 years will start in the state from tomorrow.

Vaccination of citizens in the age group of 30 to 44 years will start from tomorrow (June 19) in the state. The campaign will be implemented through the government vaccination centre. Health Minister Rajesh Tope said that vaccination of citizens above 45 years of age will continue regularly. 

Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope

The Central Government has given permission to the States to decide the priority of immunization of citizens in the age group of 18 to 44 years. Accordingly, the state health department has fixed the age group for vaccination planning and from Saturday, June 19, the vaccine will be given to citizens in the age group of 30 to 44 years.

Pre-registration for vaccination at government vaccination centres can also be done online and by visiting the centre. Necessary changes will be made in the Covin app for planning vaccination sessions for citizens between the ages of 30 and 44. Additional Director of the Department Dr Archana Patil has sent a letter to all the Deputy Directors of Health, District Surgeons, District Health Officers in the state and instructed them to provide training to the concerned staff.

 

राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात. 

राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ॲप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *