Bank of Maharashtra organizes ‘Covid Vaccination Drive’ for the Front Liners.
Mr. A. S. Rajeev, Managing Director & CEO, Bank of Maharashtra (BoM) inaugurated two days ‘Covid Vaccination Drive’ for front line employees of the Bank at MES Balshikshan Mandir, Mayur Colony, Pune. Mr. R. S. Bansal, General Manager, HRM, Head Office along with Mr. Rajesh Singh, Mr. Jatin Desai & Mr. Vivek Dhawan, Zonal Managers of Pune City Zone, Pune West Zone & Pune East Zone respectively were present at the function.
Mr. A. S. Rajeev, Managing Director & CEO, Bank of Maharashtra requested and urged staff members, who are yet to be vaccinated to take advantage of these two days ‘Covid Vaccination Drive’ and get themselves inoculated. He also stated that vaccination will certainly boost the morale of the employees to serve customers in a better and efficient way.
‘Covid vaccination Drive’ has been arranged in association with Deenanath Mangeshkar Hospital, Pune. During this vaccination drive, any employee of the Bank can walk in for on-the-spot registration at a dedicated CoWin portal dashboard which has been made available by the Pune Municipal Corporation, especially for BoM employees. Moreover, individual employees of the Bank need not pay for vaccination as it will be borne by the Bank. ‘Covid Vaccination Drive’ has been organized by following all Covid related protocols and observing appropriate Covid behavior.
Bank has taken various precautionary & welfare measures in the interest of Staff members and their well-being especially working in the Front Line.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून आघाडी वरील कोव्हीड योद्ध्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आघाडी वरील कोव्हीड योद्ध्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर, कोथरूड पुणे येथे आयोजित कोव्हिड लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.या प्रसंगी बँकेचे मानव संसाधन विभागाचे सरव्यवस्थापक श्री आर एस बंसल, पुणे शहर विभागाचे विभागीय प्रबंधक श्री राजेश सिंह , पुणे पश्चिम विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री जतीन देसाई व पुणे पूर्व विभागाचे व्यवस्थापक श्री विवेक धवन उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांना सदर दोन दिवसीय कोव्हीड लसीकरण मोहिमेचा लाभ घेऊन लस टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ होऊन ग्राहकांना अधिक उत्तम व कार्यक्षम सेवा देण्यासाठी हुरूप मिळेल असेही श्री राजीव यांनी सांगितले. .
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने सदर कोव्हीड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कोव्हीड लसीकरण मोहिमेच्या दरम्यान बँकेचा कोणताही कर्मचारी आयत्या वेळी लसीकरणाच्या ठिकाणी येऊन पुणे महानगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांसाठी खास उपलब्ध करून दिलेल्या कोविन पोर्टल डॅशबोर्ड वर आपली नोंदणी करून लसीकरण करून घेऊ शकेल. बँक ऑफ महाराष्ट्र सदर लसीकरणाचा खर्च सोसणार असल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना या लसीकरणासाठी वैयक्तिक स्तरावर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. कोविड संबंधित सर्व नियमांचे पालन करून व उचित कोव्हीड वर्तणुकीची खबरदारी घेऊन सदर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
बँकेच्या शाखा मध्ये कार्यरत आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी बँकेने अनेक दक्षतेच्या व लाभदायक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.