CT scan, sonography and MRI devices to be provided to rural hospitals and health centers in the state – Rajesh Tope
राज्यात ग्रामीण रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एम आर आय यंत्र पुरवणार – राजेश टोपे
कोल्हापूर: राज्यातली ग्रामीण रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना सीटी स्कॅन आणि डायलिसिससह सोनोग्राफीची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर इथं ही माहिती
दिली.
प्रत्येक जिल्ह्याला एमआरआय स्कॅनिंग यंत्रही दिलं जाणार आहे. बाह्य यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधांची निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन-तीन
महिन्यांत प्रत्यक्ष या सुविधा उपलब्ध होतील, अशी ग्वाहीही टोपे यांनी दिली.