देश सायबर सुरक्षित हवा असल्यास देशवासियांना सायबर प्रशिक्षित करणे आवश्यक

Publication of the book 'Cyber Threats and Countermeasures' written by Dr. Deepak Shikarpur डॉ.दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना' पुस्तकाचे प्रकाशन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

If the country wants to be cyber-safe, citizens need to be cyber-trained

देश सायबर सुरक्षित हवा असल्यास देशवासियांना सायबर प्रशिक्षित करणे आवश्यक

डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ पुस्तकाचे प्रकाशन

सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ पुस्तक उपयुक्त : चंद्रकांतदादा पाटील

पुणे : सायबर गुन्हे कसे घडतात ते कसे टाळता येतील याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने अडकत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्याने सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.Publication of the book 'Cyber Threats and Countermeasures' written by Dr. Deepak Shikarpur
डॉ.दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना' पुस्तकाचे प्रकाशन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

एकविरा प्रकाशनतर्फे संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ऑक्टोबर महिना जागतिक स्तरावर ‌‘सायबर सुरक्षा प्रसार’ महिना म्हणून ओळखला जातो. हे निमित्त साधून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

पुस्तक लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण स्मार्ट असणे ही चैन नसून काळाची गरज आहे. परंतु झटपट अर्थार्जनाच्या हेतूने काही संगणकतज्ज्ञ सायबर गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे दुधारी तलवार आहे. या तंत्रज्ञानातून निर्माण होणारा ई-कचरा, सायबर गुन्हे तसेच डिजिटल व्यसनाधिनता याची जाण समाजातील प्रत्येक घटकाला यावी या करिता या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

डॉ. शिकारपूर पुढे म्हणाले, आपल्याला देश सायबर सुरक्षित हवा असल्यास देशवासियांना सायबर प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती खूप मोठी असल्याने नवनवीन प्रकारचे गुन्हे-घोटाळे घडत आहेत. त्यामुळे याविषयी जनजागृती व्हावी, सायबर गुन्ह्यांविषयी कडक कायदे व्हावेत.
सामान्य जनतेसह दृष्टीहीन व्यक्तिंनाही या गुन्ह्यांमधून धोका संभवतो. त्यामुळे अंध व्यक्तिंमध्येही सायबर गुन्ह्यांविषयी जागृती होणे गरजेचे आहे. या पुस्तकाची ब्रेल लिपितील लवकरच प्रकाशित होणारी आवृत्ती अंध शाळांमध्ये पोहोचावी यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. शिकारपूर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या अपेक्षेला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व अंध शाळांमध्ये स्वखर्चाने ब्रेल लिपितील हे पुस्तक पोहोचवू अशी ग्वाही दिली. प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
Spread the love

One Comment on “देश सायबर सुरक्षित हवा असल्यास देशवासियांना सायबर प्रशिक्षित करणे आवश्यक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *