Dedication of Primary Health Center in Osmanabad District
उस्मानाबाद जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यात समुद्रवाणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दूरदृष्यप्रणालीमार्फत केलं.
Covid-19 संकट काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य सुविधा पोहोचवणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना धन्यवाद देत आरोग्य यंत्रणेच्या कामाचं कौतुक त्यांनी केल.आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे तसंच इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा आणि तालुका पातळीवर अद्ययावत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत असून प्राथमिक आरोग्य केंद्राचा रूपांतर आरोग्यवर्धिनीत केल्यामुळे खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा गावांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. असं आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले.
आरोग्य विभागातल्या 50 टक्के रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.