दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली दौसा- लालसोट टप्प्याचं उद्या लोकार्पण

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The Prime Minister will inaugurate the Delhi Dausa-Lalsot section of the Delhi-Mumbai Expressway tomorrow

दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली दौसा- लालसोट टप्प्याचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

दिल्ली आणि जयपूर मधला प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार

हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून राजस्थान आणि कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान 18,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या देशाच्या रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी आणि लोकार्पण करण्यासाठी दुपारी 3 वाजता दौसा येथे पोहोचतील.Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-दौसा-लालसोट या २४६ किलोमीटर टप्प्याचं राष्ट्रार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार आहेत. या क्षेत्रासाठी १२ हजार १५० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. द्रुतगती महामार्गाच्या या पट्ट्यामुळे दिल्ली आणि जयपूर मधला प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे, तसंच या क्षेत्राच्या संपूर्ण आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग हा भारतातला १ हजार ३८६ किलोमीटर एवढ अंतर असणारा सर्वात मोठा महामार्ग ठरणार असून या दोन मुख्य शहरांदरम्यान प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार असून कोटा, इंदोर, जयपुर, भोपाळ वडोदरा आणि सुरत यासारख्या मुख्य शहरांना जोडणार आहे. या महामार्गामुळे लगतच्या सर्व क्षेत्रांचा आर्थिक विकास होणार असून देशाच्या आर्थिक परिवर्तनात याचं योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 5 हजार 940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 247 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता, पंतप्रधान मोदी बेंगळुरूमधील येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशन येथे एरो इंडिया 2023 च्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन करतील. एरो इंडिया 2023 ची थीम “एक अब्ज संधींची धावपट्टी’ आहे.

‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या व्हिजनच्या अनुषंगाने हा कार्यक्रम स्वदेशी तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यावर आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर भर देणार आहे.

भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतावर पंतप्रधानांचा भर देखील प्रदर्शित केला जाईल, कारण या कार्यक्रमात देशाची डिझाईन नेतृत्व, UAVs क्षेत्रातील वाढ, संरक्षण अंतराळ आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविली जाईल.

एरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग असेल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *