Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the Corona situation in the state.

Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the Corona situation in the state as well as Corona preventive measures. 

           Experts warn that children may be at greater risk in the third wave of the corona. Careful planning should be done for the uninterrupted availability of oxygen with an adequate supply of remediation. Deputy Chief Minister Ajit Pawar today instructed to complete the work of new oxygen projects to be set up in the state and,  to audit the use of oxygen. Deputy Chief Minister Ajit Pawar clarified that ‘Mukarmycosis’ has been included in the Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana and the required funds of Rs 30 crore have been made available for it.

            Deputy Chief Minister Ajit Pawar today reviewed the Corona situation in the state and preventive measures in the committee hall of the Deputy Chief Minister’s Office. Health Minister Rajesh Tope, Medical Education Minister Amit Deshmukh (via VC), Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane (via VC), Chief Secretary Sitaram Kunte, and senior officers of various departments were present.

                 Deputy Chief Minister Ajit Pawar said that considering the possibility of a third wave of corona in the state, the administration should take immediate steps to address the issue. Experts have warned that children are at greater risk of corona in this wave. Therefore, for the safety of children, separate arrangements should be made for treatment. This should include ventilators for children as well as medicines for them, materials for other treatments. Deputy Chief Minister Ajit Pawar directed to set up this system as soon as possible before the third wave arrives.

Directs to audit oxygen consumption including setting up of a separate system for treatment of children

Inclusion of ‘Mucormycosis’ in Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana;

Funds of Rs 30 crore available for the treatment of ‘Mucormycosis’

 Deputy Chief Minister Ajit Pawar

            An international tender is being issued to increase the supply of 25,000 metric tonnes of medical oxygen to the state. PSA plants are being set up in every district to generate oxygen from the air to meet the demand for oxygen. The process of setting up 301 plants in 36 districts of the state is underway. Out of which 38 plants are working. These 38 plants are supplying 51 metric tons of oxygen. PSA plants are being set up in hospitals affiliated with all medical colleges in the state and in district general hospitals. A work order has been issued for the setting up of 240 plants and the process is underway. In the near future, all the plants will generate a total of about 400 metric tons of oxygen per day in the state. This oxygen will meet the need for more than 19,000 oxygen beds.

Ajit Pawar
A meeting (via VC) was held at the Ministry under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar to review the measures including the Corona situation in the state.

              In order to ensure efficient distribution of available medical oxygen in the state, it should be distributed keeping in view the district-wise number of Kovid patients, said Deputy Chief Minister Ajit Pawar. Under the guidance of the Secretary of the Department of Medical Education, Secretary level officers for each of the two departments are monitoring and controlling it. He instructed the Deputy Chief Minister to expedite the work by coordinating the construction work of the new plant being set up in the state. Instructions were also given to manage and audit the demand for medical oxygen. Technical audit and medical audit of plant and hospital level in each district should be done by the Collector. The Deputy Chief Minister instructed to appoint an oxygen nurse in each hospital to ensure strict use of oxygen.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा.

            मुंबई, दि. १७ :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिव्हिररच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या  अखंडित  उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थिती सह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar
राज्यातील कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे (व्हीसीद्वारे)आयोजन करण्यात आले होते.

                 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशीघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

 

लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे  निर्देश

 

‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश;

 

‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

 

– उपमुख्यमंत्री अजित पवार 

 

            राज्यासाठी २५ हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येत आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लॅन्टची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ३०१ प्लॅन्ट उभारण्याची प्रक्रीया सुरु आहे. त्यापैकी ३८ प्लॅन्ट कार्यरत आहेत. या ३८ प्लॅन्टमधून ५१ मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीएसए’ प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. २४० प्लॅन्ट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही काळात सर्व प्लॅन्टचद्वारे राज्यात एकूण सुमारे ४०० मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे १९ हजारपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पुर्ण होईल.

              उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे राज्यात कार्यक्षमपणे वितरण होण्यासाठी कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या  लक्षात घेऊन वितरण करण्यात यावे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दोन विभागांसाठी सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन त्याचे नियंत्रण करत आहेत. त्यांनी राज्यात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामात समन्वय ठेवत काम वेगाने करुन घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन आणि लेखा परीक्षण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यातील प्लॅन्टच्या व रुग्णालयाच्या स्तरावर टेक्नीकल ऑडिट व मेडिकल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावे. ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सची नियुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *