Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the measures including the corona outbreak situation in Pune.

Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the measures including the corona outbreak situation in Pune.

   Considering the possibility of children being affected in the third wave of the corona. The state government and administration are planning to make health facilities more efficient and measures should be taken in this regard, said Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar.

           He was speaking at a review meeting on Corona’s situation and measures chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar at Council Hall in Pune. Deputy Chief Minister Ajit Pawar inquired about the current status of Coronavirus in the Pune district, measures being taken by the administration, and vaccination.

Proceedings aimed at enabling the health system for a possible third wave .    

                                                                       

Construction of Oxygen Generation Plant

 Efforts are being made to expedite vaccination against corona

 Fire audit of hospitals in the district

 Planning of all measures to treat children if they become infected

Emphasis on the preparation of health facilities including oxygen and ventilator beds, medicines, remedies.

 

-Deputy Chief Minister Ajit Pawar.

           

Ajit Pawar
A review meeting on Corona’s situation and measures was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar at Council Hall in Pune.

          Deputy Chief Minister Ajit Pawar said that in the case of the possible third wave of Corona, the state government is planning to provide necessary treatment to the children in time. A task force of pediatricians is being set up. The Deputy Chief Minister Ajit Pawar said that guidance is being provided for the treatment of children, preventive medicines, necessary equipment, and medical facilities are being prepared, adding that Sassoon Hospital, Yashwantrao Chavan Hospital, Hospital, Naidu Hospital, Bharti Hospital, Symbiosis Hospital, Ruby Hospital in the district. , Private hospitals like Dinanath Mangeshkar Hospital should also take action to reserve separate beds for children in the hospital. Outbreaks appear to be exacerbated during coronary heart disease. He said that in order to ensure smooth supply of medicines to the hospitals and to prevent any malpractice, action is being taken to supply these medicines through the District Collector. 44 Oxygen Generation Plants are proposed in the district to streamline oxygen supply. Out of these, Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation have started a total of 4 Oxygen Generation Plants, 2 each. He suggested that other Oxygen Generation Plants should also be started as soon as possible.

         The state government is making efforts to vaccinate more and more citizens above the age of 45 in terms of corona prevention. But the vaccine is currently available in limited quantities. Efforts will be made to vaccinate all citizens above the age of 18 when adequate vaccines are available.

             In Pune and Pimpri-Chinchwad, the drop in patients rates this week is reassuring. However, infection is still on the rise in rural areas. State restrictions have been extended to June 1 to break the chain of corona infection. He appealed to the citizens to abide by the rules and cooperate with the administration.

            Take action to create adequate medical care facilities for young children in the potential third wave of the corona. Increase health facilities in rural areas along with urban areas. Make necessary preparations to provide oxygen supply, bed availability, remedicivir injection as well as medicines for mucosal mycosis, medicine for children, medical services, he added.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती सह उपाययोजनांचा आढावा.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्यावतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

           पुण्यातील  कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.  पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु

 

■ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट ची उभारणी

■ ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरण जलद गतीने होण्यासाठी प्रयत्नशील

■ जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

■ लहान मुले बाधित झाल्यास त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सर्व उपाय योजनांचे नियोजन

■ ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त बेड, औषध, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांच्या तयारीवर भर

 

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

        

Ajit Pawar
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . 

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवर उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.  ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठी च्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात 44 ऑक्सीजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी 2 असे एकूण 4 ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत, अन्य  ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या

         कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षावरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. परंतु सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

             पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्णदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण होण्यासाठी कार्यवाही करा.  शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमिडिसिव्हीर इंजेक्शन तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *