Deputy Chief Minister reviewed the corona outbreak situation and measures in the Pune district.

Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the corona outbreak situation and measures in the Pune district.

Considering the potential danger of the third wave of the corona, Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar today instructed to reserve separate rooms for children in major hospitals in rural areas of the district including Pune, Pimpri Chinchwad.   He was speaking at a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar at the Council Hall in Pune to review the Corona situation and measures.   During the meeting, Deputy Chief Minister Ajit Pawar inquired about the current status of Coronavirus in the Pune district, the current status of Mucormycosis, measures to be taken by the administration, medical facilities for children, and vaccination.

          Deputy Chief Minister Ajit Pawar said medical facilities need to be set up considering the potential third wave of the corona. The health system in rural areas needs to be strengthened. Provide adequate manpower, machinery, preventive medicines for the treatment of children in rural hospitals. Take action to reserve separate beds in the hospital for young children.

 

Strengthen healthcare in rural areas

Create facilities in urban and rural areas for the treatment of young children

Try to reduce mortality

Take action against hospitals that charge extra bills

Take action against hospitals that do not conduct fire audits and misuse drugs

Appoint an officer to inspect the Covid Center

 Emphasis on ‘corona’ preventive vaccination

 

Reserve separate wards for young children in rural hospitals, including urban areas, in view of the potential third wave of the corona. Deputy Chief Minister Ajit Pawar

              Fire Fighting System- It is necessary to check the firefighting system of all the hospitals in the district and rectify the errors. Take action against hospitals which do not conduct fire audit, such instructions were given by Deputy Chief Minister Ajit Pawar.

Increased Bills: Deputy Chief Minister Ajit Pawar has directed to take action against the hospitals which are charging extra bills as well as misappropriating medicines for the patients by checking the bills charged by the patients admitted for treatment in the hospitals.

Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar at the Council Hall in Pune to review the Corona situation and measures.

Appointment of officers for inspection of Covid Center- Deputy Chief Minister Ajit Pawar instructed to appoint officers of various departments for inspection and control of medical facilities, etc. in Covid Center as per the guidelines of the Health Department.

 Drug control over mucormycosis – The incidence of mucormycosis is increasing in corona patients. The supply of medicines for this disease should not be irregular and the medicines are being controlled by the District Collector to ensure smooth supply to the hospitals. Citizens who have recovered from corona should be informed by telephone whether they are experiencing mucormycosis or any other symptoms so that they can be treated in time.

         Emphasis on Vaccination- Efforts are being made by the state government to vaccinate more and more citizens in view of Corona Prevention. Emphasis is currently being placed on vaccinating citizens above 45 years of age and efforts will be made to vaccinate all citizens above 18 years of age once adequate vaccines are available.

            Patient control – Patient rates appear to be lower this week than last week, which is reassuring. However, efforts should be made to bring the mortality rate under control.

   Adequate medical care should be provided for children. Increase health facilities in rural areas along with urban areas. Oxygen supply, availability of beds as well as supply of medicines for mucosal mycosis, necessary measures for young children, medical services should be provided, he added.

         Minister of State Dattatraya Bharane said measures need to be taken in the wake of the third wave. Necessary medical facilities should be set up in rural areas. He also said that the bills levied by the hospitals should be checked. 

                           Dr. Subhash Salunke said that ICMR has given instructions not to use Remedicivir and Plasma, which must be followed by hospitals. He informed about the medical services required for young children, control of new strains of Covid-19, and measures required for mucosal mycosis.

             Collector Dr. Rajesh Deshmukh said the number of corona cases in the district has been declining this week as compared to last week. Measures being taken by the administration in the district to reduce the patient mortality and mortality rate in Pune district by providing information about the medical services being administered for children. He also gave information about the demand for remedicavir, supply covid-19, and the incidence of mucormycosis and mortality. Also, District Collector Dr. Deshmukh informed about the measures being taken to improve the supply of oxygen and remediation. Strict action was taken against the citizens who did not comply with the restrictions.  The meeting was attended by the chief officers of various agencies.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा. 

 कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.   पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

  पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा.

ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करा

लहान बालकांवर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात सुविधा निर्माण करा

मृत्यू दर कमी होण्यासाठी प्रयत्न करा

जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

 फायर ऑडिट न करणाऱ्या व औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकारी नियुक्त करा

 ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरणावर भर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अग्निशमन यंत्रणा- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

वाढीव बिले आकारणी-  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या तसेच रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

Ajit Pawar
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली.

कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती- कोविड सेंटर मध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन, वैद्यकीय सुविधा आदी बाबींची पाहणी व नियंत्रण यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

 ‘म्युकर मायकोसिस’ वरील औषधाचे नियंत्रण- म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी  या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील.

         लसीकरणावर भर- कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

          रुग्णदर नियंत्रणात – मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णदर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, मृत्यू दर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

   लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध पुरवठा, लहान बालकांसाठी आवश्यक उपाययोजना, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

         राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्यात. रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले. 

                          डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, रेमडीसीविर व प्लाझ्माचा वापर करु नये, अशा सूचना आयसीएमआरने दिल्या आहेत, याचे पालन रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. लहान बालकांसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधा, कोविड -19 च्या नव्या स्ट्रेनच्या नियंत्रणासाठी व म्युकर मायकोसिस साठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.

             जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती देवून  पुणे जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी, पुरवठा कोविड-19 व म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी माहिती दिली. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *