आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated various development works in Ambegaon Taluka उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Inauguration of various development works in Ambegaon taluka

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न-अजित पवार

पुणे : राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated various development works in Ambegaon Taluka
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असतांना पोलीस दल विविध सण, उत्सव आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी ऊन, थंडी, पाऊस, सुट्टीची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सोबत त्यांचा परिवारांदेखील विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे असून त्याादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणाचा समतोल साधतांना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे जागेचे सपाटीकरण करुन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

शासनाच्यावतीनेबेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. शेतकरीवर्गासोबत सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आणि बस स्थानक इमारत, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा कामांचे ई-भूमीपूजन करण्यात आले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

एमएच 60 आर ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात दाखल होणार

Spread the love

One Comment on “आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *