राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील जेष्ठ नागरीकांना साहित्याचं वितरण

Distribution of literature to senior citizens of Nagar district through Rashtriya Vayoshri Yojana

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील जेष्ठ नागरीकांना साहित्याचं वितरणRashtriya Vayoshri Yojana

अहमदनगर: देशातील जेष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या साधनसाहित्याची निर्मिती देशात सुरू करून केंद्र सरकारनं आत्मनिर्भरतेसाठी आणखी एक पाउल पुढे टाकलं असल्याचं प्रतिपादन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेद्र कुमार यांनी केलं आहे.

ते आज अहमदनगर इथं बोलत होते. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण डॉ विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत झालं.

नगर जिल्ह्यातील ३७ हजार ज्येष्ठ नागरीकांना सुमारे ३७ कोटी ९५ लाख रुपयांचं  साधनसाहीत्य केंद्र सरकारच्या वतीनं मोफत देण्यात आलं आहै

. यासाठी नगर जिल्ह्य़ात तालुकास्तरावर १४ शिबिरांचं  नियोजन करण्यात आलं  होतं .यातील ८९५ पात्र लाभार्थ्यांना आज साहित्य देण्यात आलं. आगामी  काळात एक लाखापर्यत या योजनेचा लाभ विस्तारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार  खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *