विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार

State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Divisional Commissioner Saurabh Rao will inspect the brief review program on November 30

विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार

पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणारElection Commission of India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागासाठी मतदार यादी निरीक्षक (इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर) म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली असून ते ३० नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाची पाहणी करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान अधिनस्त जिल्ह्यांना किमान ३ भेटी देणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत श्री. राव हे पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि नागरिकांना मतदार नोंदणीबाबत समस्या असल्यास त्यांनी गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार
Spread the love

One Comment on “विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *