डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ, सामाजिक कार्यकर्ता आणि संशोधक पुरस्कार जाहीर

Dr Babasaheb Ambedkar Granth, Social Worker and Researcher Award announced

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ, सामाजिक कार्यकर्ता आणि संशोधक पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुरस्कारांची घोषणा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडिज’ च्या वतीने यंदाच्या वर्षीपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ, सर्वोत्कृष्ट कार्यकार्ता आणि सर्वोत्कृष्ट संशोधक हे तीन पुरस्कार जाहीर केले आहेत.

यंदाच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या डॉ. योगीराज बागुल यांच्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. त्यासोबत तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये डॉ. सोमनाथ कदम यांचा ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ , तुकाराम रोंगटे यांचा ‘आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. विलास आढाव यांचा ‘चिरेबंदी कृषी बाजार आणि दुर्बल शेतकरी’ या ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार डॉ. चित्रा कुरहे आणि सुभाष वारे यांना जाहीर झाला आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांना जाहीर झाला आहे. तर संशोधनातील पुरस्कार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. मिलिंद आवाड यांना जाहीर झाला आहे.

हे पुरस्कार प्रा. केविन ब्राउन आणि श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत २१ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी ४ वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारार्थींची निवड बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे माजी प्रमुख प्रा. प्रदीप आगलावे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. कृष्णा महाजन, मुंबई विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. अनिल कुमार फुले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ आंबेडकर स्टडीजचे प्रमुख डॉ. विजय खरे आदींच्या निवड समितीने केली आहे.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *