Dr Babasaheb Ambedkar’s 7th November School Entry Day; idea to celebrate as Student’s Day – Ramnath Kovind
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर शाळाप्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा विचार -रामनाथ कोविंद
रत्नागिरी: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेशाचा दिवस 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा विचार असल्याचं राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते महाराष्ट्राच्या चार दिवसीय दौऱ्यादरम्यान आज रत्नागिरीत आंबडवे गावी बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर बोलत होते.
बाबासाहेबांशी संबंधित पाच ठिकाण पंचतीर्थ म्हणून ओळखली जात असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वडिलांकडून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतल्याचं ते म्हणाले. घटनेच्या माध्यमातून जनतेला आपले अधिकार मिळाल्याचं कोविंद यांनी यावेळी सांगितलं.
बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक जण शिक्षणाकडे वळले. शिक्षणानं जीवन प्रगत होत असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. बाबासाहेब स्वतः स्वयंरोजगाराचे समर्थक होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लोकांनी स्वयंरोजगाराकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा गोडवा अख्ख्या देशात पसरल्याचं प्रशंसोउद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले.