पुणे मंडळ म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

MHADA recruitment exam from Monday.

The spontaneous response of citizens to the draw of Pune Mandal MHADA

पुणे मंडळ म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने केले अर्जMHADA recruitment exam from Monday.

पुणे : पुणे मंडळ म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२३ च्या सोडतीच्या जाहिरातीस अनुसरुन ७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. यापैकी एकूण ५१ हजार ६०० अधिक नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे.

अनामत रक्कम जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असून अर्जदारांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत तसेच ऑनलाईन पद्धतीने रात्री बारा वाजेपर्यंत अनामत रक्कम जमा करता येता येणार आहेत.

तरी अर्जदारांनी या संधीचा लाभ घेऊन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करावा, असे आवाहन पुणे मंडळ म्हाडाच्यावतीने करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
स्वार्थाच्या राजकारणामुळे विसरलेली जात पुन्हा वर येत आहे
Spread the love

One Comment on “पुणे मंडळ म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *