भाजपाच्या कार्यकाळात देशाच्या विकासानं वेग घेतला – नरेंद्र मोदी.

During the tenure of BJP, the development of the country gained momentum – Narendra Modi.

भाजपाच्या कार्यकाळात देशाच्या विकासानं वेग घेतला – नरेंद्र मोदी.

नवी दिल्ली : भाजपच्या कार्यकाळात देशाच्या विकासनं वेग घेतला असून गेल्या काही वर्षांमध्ये देशानं विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर

Prime Minister Narendra Modi
File Photo

लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते.

प्रधानमंत्री आवास योजनेनं चांगला वेग घेतला असून या योजने अंतर्गत घर मिळवणार्यांना ‘लखपती’ असं संबोधलं जात आहे. अशा प्रकारे  भाजपाच्या कार्यकाळात देशातली गरीब जनता  लखपती झाल्याचं ते म्हणाले. या काळात सरकारी मदत गरिबांच्या खात्यात  थेट जमा झाली, गरीबाच्या घरातही शौचालय आलं,  घरोघरी स्वयंपाकाचा  गॅस  आल्यामुळे धुरापासून मुक्ती मिळाली तसंच  घरी वीज आल्यावर गरिबांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद संपूर्ण देशाला आनंदित करून गेल्याचं ते म्हणाले. 

देश अमृतकाळात प्रवेश करत असून जगाचं नेतृत्व करण्याची स्वतःची क्षमता आपण ओळखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटकाळावर आपण  मात केली असून गेल्या वर्षभरात देश अनेक क्षेत्रात सक्षम झाला. तसंच भारतीय लस जगात सर्वात जास्त प्रभावी ठरल्याचं ते म्हणाले. गेली २८ वर्ष गोव्यातल्या जनतेनं काँग्रेसला सत्तेत आणलं नाही, नागालँडमध्ये देखील १९९८ नंतर काँग्रेसचं शासन आलं नाही. यावरून देशातली जनता विरोधकांना सातत्यानं नाकारत असल्याचं दिसून येत आहे.  मात्र पराभवानंतरही त्यांचा अहंकार जात नसल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.

काँग्रेसला ५० वर्ष देश चालवण्याची संधी मिळाली मात्र आता त्यांना आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या विकासकामांवर विरोधक सातत्यानं टीका करत असून आंधळा विरोध लोकशाहीचा अपमान करत असल्याचं ते म्हणाले. गांधीजींची स्वप्न प्रत्यक्षात येताना काँग्रेसला पाहवत नसून बापूंचं नाव घेणाऱ्या काँग्रेसचा आत्मनिर्भर व्हायला विरोध असल्याची टीका प्रधानमंत्री मोदी यांनी केली.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *