Collector Dr Suhas Diwase appeals to eligible voters to register voters
पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आवाहन
पुणे : निवडणूक जाहीर झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदारांकडून प्राप्त मतदार नोंदणी करण्याबाबत नमुना क्र. ६ व पत्त्यात दुरुस्ती करण्याबाबत नमुना क्र. ८ वर अंतिम कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याने पात्र मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
निवडणूक वर्षात मतदार यादीत नाव नोंदणी, स्थलांतर व वगळणी करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार नागरिकांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाईन अॅप’ वर ऑनलाईन किंवा जवळच्या तहसिल कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने नमुना क्र.६ चा अर्ज सादर करता येईल. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करावी असे, आवाहन डॉ.दिवसे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
‘भारत शक्ती “या तिन्ही सैन्यदलांच्या डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग
One Comment on “पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन”