‘स्माईलतर्फे पर्यावरणपूरक बाप्पा’ चे आयोजन

Bhau_rangari_ganpatiश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organized ‘Environmental Friendly Bappa by Smile’

‘स्माईलतर्फे पर्यावरणपूरक बाप्पा’ चे आयोजन

पर्यावरण पूरक Dagdusheth_Halwai-Ganpati हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News साजरा करण्याच्या उद्देशाने शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याचे प्रशिक्षण

पुणे : स्फूर्ती महिला मंडळाच्या SMILE ( Savitri Marketing Institute For Ladies Empowerment) उपक्रमाच्या अंतर्गत गेली 10 वर्षे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरात विविध ठिकाणी, शाळांमध्ये, सोसायट्यांमध्ये हे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या हाताने गणपती बनवण्याचा आनंद अनेक महिला, मुले व परिवार घेत आलेले आहेत. आत्तापर्यंत सुमारे १ लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले

याच उद्देशाने या वर्षी ‘ Make your Own Eco Friendly Bappa ‘ हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षक तयार करण्यासाठी SMILE च्या वतीने नुकतीच इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे एक कार्यशाळा घेण्यात आली. शहराच्या विविध भागातील सुमारे 40 महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

संस्थेतर्फे गणेश मूर्ती बनविन्यास साहित्य देण्यात आले. संस्थेच्या सदस्या सौ रत्ना नाईक यांच्या प्रशिक्षणानुसार, मूर्ती बनविण्यातील बारकावे समजून घेत प्रत्येक महिलेने स्वतःची गणेश मूर्ती तयार केली. या प्रसंगी उपस्थित संस्थेच्या संस्थापिका खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले की या प्रशिक्षित महिला आपापल्या भागातील महिला व मुलांना शाडूच्या मातीचा गणपती बनविण्यास शिकवतील ज्या योगे पर्यावरणाचे रक्षण होईल व स्व – निर्मितीचा आनंदही मिळेल. संस्थेच्या वतीने संजीवनी जोगळेकर, वृषाली दाभोळकर व शीतल घाडगे यांनी संयोजन केले.

आपल्या भागात ‘Eco Friendly Bappa’ बनविण्याचे प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा – शीतल घाटगे 9730048250

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण
Spread the love

One Comment on “‘स्माईलतर्फे पर्यावरणपूरक बाप्पा’ चे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *