युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारताकडून मदत कक्षाची स्थापना

Establishment of a help desk from India to help Indians stranded in Ukraine

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारताकडून मदत कक्षाची स्थापनाHelpdesk Library

नवी दिल्ली : युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी गेलेलं – AI १९४७ हे  एअर इंडियाचं विमान युक्रेनच्या सीमेवरच्या तणावामुळे दिल्लीला परतलं.

मात्र युक्रेन सीमेवरील युद्धसदृश्य तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना माहिती देण्यासाठी तसंच सहकार्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीत कंट्रोल रुम सुरू केली आहे. माहिती तसंच सहाय्यासाठी नागरिकांनी १८००११८७९७ या टोल फ्री आणि ९१ ११ २३०१२११३, ९१ ११ २३०१४१०४, ९१ ११ २३०१७९०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असं मंत्रालयानं कळवलं आहे.

युक्रेनमधल्या भारतीय दुतावासानंही  हेल्पलाईन  सुरू केली आहे. युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांनी धीर सोडू नये. तसंच, असेल तिथेच सुरक्षित स्थळी रहावं असं आवाहन भारतीय दूतावासानं केलं आहे. किव शहरात जाणाऱ्या वा येणाऱ्या नागरिकांनी प्रवास टाळून आहे त्याच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं आवाहनही भारतीय दूतावासानं केलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *